सुटलेले ओटीपोट हे नेहमीच जाडीचं किंवा वजन वाढल्याचं लक्षण नसतं. अनेकदा हे गॅस, पचन नीट न होणं, पोट साफ न होणं किंवा हार्मोन्समधील बदल यामुळे होतं. पाळीपूर्वी शरीरात काही बदल होतात, त्यामुळेही पोट फुगल्यासारखं वाटू शकतं.( lower belly fats? It doesn't hurt but feels heavy? Do these 5 remedies) तळलेले, मसालेदार,प्रोसेस्ड पदार्थ,कमी पाणी पिणं आणि ताणतणाव यामुळेही हा त्रास वाढतो.
पचन बिघडल्यास आतड्यांमध्ये वायू साठतो,त्यामुळे ओटीपोट सुटलेलं दिसतं. जास्त बसून काम करणं आणि व्यायामाचा अभाव यामुळे पोटाभोवती चरबी साठते. त्यामुळे हा त्रास दिसायला साधा असला तरी आतून शरीराची गडबड दाखवतो. खाली काही सोपे उपाय आहेत ते नक्की करुन पाहा.
१. कोमट पाणी आणि लिंबू-मध:
सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळाायचा आणि एक चमचा मध मिसळून प्यायचे. हा उपाय पचन सुधारतो, शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकतो आणि गॅस कमी करतो. नियमित केल्यास पोटाची सूज कमी होते. तसेच ओटीपोटात साठलेले घटक कमी करतो.
२. फायबरयुक्त आहार:
आहारात ओट्स, दही, फळं, भाज्या यांसारखे फायबरयुक्त पदार्थ घ्या. यामुळे पोट साफ राहते आणि बद्धकोष्ठता कमी होते. तेलकट आणि मैद्याचे पदार्थ शक्यतो टाळा. मैदा पोटात साठतो. त्यामुळे वजन तर वाढतेच मात्र ओटीपोट जास्त सुटायला लागते.
३. नियमित व्यायाम:
दररोज चालणे, प्राणायाम, पवनमुक्तासन आणि भुजंगासन ही आसने करा. ही आसनं पोटातील गॅस कमी करतात. योगाने पचन सुधारते आणि शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
४. पाळीच्या काळात काळजी:
पाळीपूर्वी हलका, घरचा आणि पचायला सोपा आहार घ्या. जड पदार्थ, चहा-कॉफी आणि मीठ कमी करा. गरम पाणी पिणं व हळदीचं दूध घेणं फायदेशीर ठरतं. पाळीच्या वेळी ओटीपोट सुटणे नैसर्गिक आहे. ते तसेच राहिले तर मग तो चिंतेचा विषय असतो.
५. ताण आणि झोप नियंत्रण:
ताणतणाव आणि झोपेचा अभाव यामुळे हार्मोन्स असंतुलित होतात. त्यामुळे दररोज ७-८ तासांची झोप घ्या आणि मन शांत ठेवण्यासाठी ध्यान किंवा श्वसनाचे व्यायाम करा.
हे उपाय नियमित पाळल्यास ओटीपोट सुटण्याचा त्रास हळूहळू कमी होतो आणि शरीर आतून हलकं, निरोगी आणि संतुलित वाटतं.