Test To Diagnose Heart Attack Risk: वेगवेगळ्या रिपोर्टमधून नेहमीच समोर आलं आहे की, दरवर्षी जगभरात सुमारे 18 मिलियन लोकांचा मृत्यू वेगवेगळ्या हृदयरोगांमुळे होतो, त्यातील भारतातील प्रमाणही बरंच जास्त आहे. हा आकडा सर्व कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा अधिक आहे. अनेक एक्सपर्ट नेहमीच सांगतात की, हृदयरोगाच्या मुख्य कारणांमध्ये चुकीची लाइफस्टाईल, हाय बीपी आणि हाय कोलेस्टेरॉल या गोष्टींचा समावेश आहे. त्याशिवाय लिपोप्रोटीन (ए) [Lp(a) ही एक आनुवंशिक अवस्था आहे जी हृदयरोगांचा धोका वाढवते. भारतात प्रत्येक 4 पैकी 1 व्यक्ती यानं प्रभावित असते, पण याची तपासणी फार क्वचित केली जाते. कारण लोकांना याबाबत फारसं माहीत नसतं.
हार्ट अॅटॅक आधी शोधून काढणारी टेस्ट
लिपोप्रोटीन (ए) हे एक कोलेस्टेरॉल आहे. शरीरात जर याचं प्रमाण वाढलं तर रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक तयार होतो. हे प्रोटीन आणि फॅटपासून बनतं. लिपोप्रोटीन टेस्ट हा एक महत्त्वाचा बायोमार्कर आहे, ज्यामुळे हृदयरोग किंवा स्ट्रोक होण्याचा धोका आधीच कळू शकतो. मात्र ही टेस्ट करण्यावर कुणी भर देत नाही.
हृदयरोगाचा आनुवंशिक धोका
नोवार्टिसच्या अलीकडील सर्व्हेनुसार, आशिया पॅसिफिक आणि मिडल ईस्टमध्ये 66% लोक नियमित हृदय तपासणी करत नाहीत. तर जवळपास 45% लोकांना हृदयविकाराचा आनुवंशिक धोका असतो हे माहीतच नाही. Lp(a) बद्दल जागरूकता खूपच कमी आहे – फक्त 22% लोकांनी या टेस्टबद्दल ऐकलंय, तर केवळ 7% लोकांनी ती केली आहे.
लिपोप्रोटीन (ए) ब्लड टेस्टचा उपयोग काय?
ही टेस्ट केली तर भविष्यात हृदयरोग होण्याचा धोका आधीच ओळखता येतो. यामुळे स्ट्रोक किंवा हार्ट अॅटॅक होण्याचा धोकाही आधीच समजू शकतो.
कधी करावी टेस्ट?
55 वर्षांपूर्वी हृदयरोगाचा कौटुंबिक इतिहास
व्हस्क्युलर डिसीज किंवा हृदयाशी निगडीत समस्या
आधी स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक झालेला असेल
पोस्ट मेनोपॉझनंतरच्या महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका
डायबिटीस, हायपरटेन्शन किंवा व्हस्क्युलर डिसीजची शक्यता अधिक असेल