हिवाळा ऋतू हा तसा सगळ्यांच्याच आवडीचा. हिवाळ्यात पडणारी गुलाबी थंडी कुणाला आवडणार नाही असे होणारच नाही. थंडीचा हा मोसम जसा आनंद घेऊन येतो त्याबरोबर तितक्याच समस्या आणि आजारपणही (Night Leg Cramps Solution) घेऊन येतो. थंडीच्या दिवसांत लहानांपासून ते मोठ्यांपर्यन्त सगळ्यांनाच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप यासोबतच आरोग्याच्या इतरही लहान मोठ्या कुरबुरी सतावतात. थंडीच्या या दिवसांत हातापायांना गोळे किंवा क्रॅम्प्स येण्याची समस्या ही त्यापैकीच एक कॉमन समस्या आहे(Leg Cramps At Night Causes Risk Factors & How To Stop Leg Pain).
या दिवसांत काहीवेळा अचानक किंवा रात्री झोपेत आपल्या हातापायांत क्रॅम्प्स येतात. हे अचानकपणे येणारे क्रॅम्प्स किंवा गोळे आपल्याला नकोसे वाटतात. क्रॅम्प्स किंवा गोळे आल्यावर त्याच्या वेदनेने जीव कासावीस होतो. काहीवेळा हे क्रॅम्प्स अगदी मिनिटभरासाठीच येतात पण त्या क्षणाला होणाऱ्या वेदना भंडावून सोडतात. थंडीच्या दिवसांत येणारे क्रॅम्प्स किंवा गोळे ही समस्या कमी करण्यासाठी अनेक उपाय करू शकतो. परंतु ज्या क्षणी हे क्रॅम्प्स येतात नेमकं तेव्हा आधी काय करायचं हे आपल्याला सुचत नाही. यासाठी क्रॅम्प्स आपल्यावर प्रथमोपचार म्हणून झटपट करता येतील असे कोणते उपाय आहेत ते पाहूयात.
हिवाळ्यात पायांत क्रॅम्प्स आल्यावर चटकन करावेत असे उपाय...
१) जर तुमच्या पायांमध्ये क्रॅम्पस येत असतील तर अंगठे पकडून स्ट्रेच करा. मांड्यांमध्ये क्रॅम्प असल्यास उभं राहून पोश्चर स्ट्रेच करा. मसल्समध्ये क्रॅम्प आल्यास लगेच हात किंवा मसाजरच्या मदतीनं ती जागा दाबा आणि स्नायूंची मसाज करा.
२) उभं राहून तळवे जमिनीवर जोरात दाबा, गरम पाण्यानं शेका किंवा गरम पाण्यात पाय बुडवून ठेवा. तुम्ही गरम पाण्यानं अंघोळही करू शकता.
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडून खाज येते? करुन पहा ५ उपाय, खाज होईल कमी- त्वचा दिसेल मऊमुलायम...
३) एका टॉवेलमध्ये आईस पॅक ठेवा आणि मसल्सभोवती रॅप करून काही मिनिटं शेक घ्या. या उपायानं तुम्हाला लवकरात लवकर आराम मिळेल.
४) व्हिटामीन बी- १२ कॉम्प्लेक्स किंवा मॅग्नेशियम सप्लिमेंट्सचे रोजच्या डाएट मध्ये समाविष्ट करा. रात्री झोपण्याआधी वॉक करा. हलका व्यायाम तुम्ही करू शकता.
खूप वर्ष सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानं स्तनांचा आकार वाढतो का? स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...
५) रोज ८ ग्लास पाणी प्या. कॅफेन आणि अल्कोहोलचे सेवन करू नका. जर अनेकदा प्रयत्न करूनही क्रॅम्प जात नसतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
रोज फक्त ३ मिनिटं करा ‘हा’ व्यायाम, स्तन ओघळणार नाही- स्तनांचे आजारही राहतील लांब...