Join us   

कॅल्शियमची कमतरता, हाडं ठणकतात? खा ६ गोष्टी, ऐन तारुण्यात फ्रॅक्चरचा धोका होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2024 5:08 PM

Know perfect diet tips for Calcium deficiency : शरीरात योग्य प्रमाणात कॅल्शियम नसेल तर लहान मुले आणि तरुणांमध्ये आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी उद्भवतात.

शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत चालण्यासाठी शरीराला खनिजं, व्हिटॅमिन्स, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कॅल्शियम यांसारख्या विविध घटकांची आवश्यकता असते. यातील एका घटकाचीही कमतरता असेल तर आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. कॅल्शियम हा यातील एक महत्त्वाचा घटक असून फक्त हाडे आणि दातांसाठी उपयुक्त असतो असे नाही तर हृदयाचे ठोके नियमित पडणे, रक्ताच्या गुठळ्या होऊ न देणे यांसाठीही शरीरात कॅल्शियमची पातळी पुरेशी असणे आवश्यक असते. शरीरात योग्य प्रमाणात कॅल्शियम नसेल तर लहान मुले आणि तरुणांमध्ये आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी उद्भवतात. कॅल्शियमची कमतरता असेल तर कधी फार थकल्यासारखे वाटणे, दातांच्या तक्रारी, सांधेदुखी, त्वचा कोरडी होणे यांसारख्या तक्रारी उद्भवतात (Know perfect diet tips for Calcium deficiency). 

शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असणे हेही कॅल्शियम कमी असण्याचे एक महत्त्वाचे कारण असते. कारण व्हि़टॅमिन डी मुळे शरीरात कॅल्शियम शोषले जात असते. शरीरच नाही तर केस आणि नखांचे आरोग्यही कॅल्शियमवर अवलंबून असते.हाडं मजबूत असतील तर ठिक नाहीतर हाडांच्या काही ना काही तक्रारी सुरु होतात आणि मग गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी यांमुळे आपण हैराण होऊन जातो. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा  ठराविक वयात शरीराला कॅल्शियमची किती आवश्यकता आहे याविषयी महत्त्वाची माहिती देतात. तसेच कॅल्शियमची पातळी कमी होऊ नये म्हणून आहारात कोणते पदार्थ टाळावेत आणि कोणते खावेत याविषयीही मार्गदर्शन करतात...

   कोणाला किती कॅल्शियम गरजेचं?

१. तरुण (महिला व पुरुष) - १००० मिलिग्रम दररोज 

२. ५० वर्षांवरील महिला - १२०० मिलीग्रॅम दररोज

३. ७० वर्षांवरील व्यक्ती - १२०० मिलीग्रॅम दररोज

४. ४ ते १८ वयोगटातील मुलं - १३०० मिलिग्रम दररोज 

टाळायला हवेत असे पदार्थ 

१. लिंबू

२. मोसंबी

३. टोमॅटो

४. चिंच

आहारात घ्यायला हवेत असे पदार्थ 

१. दूध, दही, चीज

२. चीया सिड्स, तीळ, खसखस, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया

३. बदाम आणि अंजीर

४. सोयाबीन, हिरवे मूग, राजमा 

५. पालेभाज्या

६. राजगिरा

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना