हल्ली तरुणपिढीमध्ये गुडघे दुखी, कंबरदुखीचा त्रास वाढला आहे. आधी चाळीशी किंवा पन्नाशीनंतर गुडघेदुखीचा त्रास सुरु व्हायचा.(Ayurvedic oil for knee pain relief) जर आपण डेस्क जॉब किंवा सतत एकाच जागी बसत - उभे राहात असू तर आपल्याला कंबरदुखीसह गुडघेदुखीच्या आजाराला सामोरे जावे लागते. (Homemade oil for back pain)
अनेकदा चालताना किंवा उठताना गुडघ्यांमधून आवाज येतात.(Natural joint pain relief at home) यामुळे पायाच्या हालचालीवर निर्बंध येतात.(How to cure knee pain in a week) कंबरदुखीमुळे आपल्या पाठीच्या मणक्यावर अधिक दाब येतो.(Back pain treatment at home naturally) त्यामुळे बसताना त्रास होतो. हाडांच्या सांध्यात किंवा आजूबाजूच्या मऊ ऊतींमध्ये दुखू लागले की, हा त्रास अधिक वाढतो. कमी वयातच गुडघे आणि कंबरदुखीचा त्रास वाढला असेल तर आयुर्वेदिक तेल वापरुन पाहा.(Ayurvedic remedies for joint pain) यामुळे आपल्याला नक्की आराम मिळेल.
वयाच्या चाळिशीतही पांढरे केस होतील काळे, तेलात मिसळा एक गोष्ट- केसगळतीही थांबेल, सोपा घरगुती उपाय
गुडघेदुखी आणि कंबरदुखीची आणखी एक महत्त्वाची समस्या चुकीचा आहार, व्यायाम न करणे आणि लठ्ठपणा हे देखील कारण असू शकते. गुडघे आणि कंबर दुखू लागली की, आपल्याला चालताना-फिरताना त्रास होतो. व्हिटॅमिन्स, कॅल्शियमच्या कमरतेमुळे अगदी कमी वयात आपल्याला या त्रासाला सामोरे जावे लागते. अशावेळी आपल्याला आहारात देखील बदल करायला हवा. या दुखण्यामुळे वैतागले असाल तर खास तेल उपयुक्त ठरेल. कसे बनवायचे पाहूया.
साहित्य
राईचे तेल - १ वाटी
ओवा - १ चमचा
लवंग - ७ ते ८
कापूर - ५ ते ६
कच्ची हळद - १ इंच
मेथीचे दाणे - १ चमचा
सगळ्यात आधी तेल गरम करून त्यात ओवा, लवंग, लसूण, कापूर, हळदी आणि मेथी दाणे घालून चांगले शिजवून घ्या. थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीत गाळून घ्या. गुडघेदुखी, कंबरदुखी आणि सांधेदुखीवर हे तेल रामबाण ठरते. याचा वापर केल्याने आपल्याले दुखणे कमी होईल. हा उपाय केल्याने आपल्याला महिन्याभरात आराम मिळेल.