Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Kitchen Tips : पदार्थ करपल्यानंतर भांडी स्वच्छ होता होत नाहीत? मग 'या' ट्रिक्सनी भांडी झटपट होतील चकाचक

Kitchen Tips : पदार्थ करपल्यानंतर भांडी स्वच्छ होता होत नाहीत? मग 'या' ट्रिक्सनी भांडी झटपट होतील चकाचक

Kitchen Tips : . खूप वेळ भिजवून ठेवल्यानंतर ही खराब झालेली भांडी  घासावी लागतात. जर आपण या चमच्याने किंवा ब्लेडनं स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तर ते भांडी खराब करू शकतात. म्हणून, चमक कायम ठेवण्यासाठी काही सोप्या पद्धती फायदेशीर ठरू शकतात. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 07:38 PM2021-09-16T19:38:39+5:302021-09-16T19:53:27+5:30

Kitchen Tips : . खूप वेळ भिजवून ठेवल्यानंतर ही खराब झालेली भांडी  घासावी लागतात. जर आपण या चमच्याने किंवा ब्लेडनं स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तर ते भांडी खराब करू शकतात. म्हणून, चमक कायम ठेवण्यासाठी काही सोप्या पद्धती फायदेशीर ठरू शकतात. 

Kitchen Tips : How to clean burnt milk vessel | Kitchen Tips : पदार्थ करपल्यानंतर भांडी स्वच्छ होता होत नाहीत? मग 'या' ट्रिक्सनी भांडी झटपट होतील चकाचक

Kitchen Tips : पदार्थ करपल्यानंतर भांडी स्वच्छ होता होत नाहीत? मग 'या' ट्रिक्सनी भांडी झटपट होतील चकाचक

बऱ्याचदा लक्ष नसल्यामुळे किंवा इतर कामांची घाई असल्यानं महिलांना गॅस बंद करायला उशीर होतो. गॅस जास्त जातोच पण भांडी काळीकुट्ट होतात ते वेगळं. अशी भांडी साफ करायची म्हटलं की टेंशन येतं, कारण कितीही घासलं तरी भांडी स्वच्छ होतच नाहीत. दूध उकळत असताना अनेकदा भांड्यात दूध जळते आणि यामुळे दुधाचे भांडे पूर्णपणे खराब होते. जळलेली भांडी स्वच्छ करण्याचं काम काही सोपं नाही. खूप वेळ भिजवून ठेवल्यानंतर ही खराब झालेली भांडी  घासावी लागतात. जर आपण या चमच्याने किंवा ब्लेडनं स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तर ते भांडी खराब करू शकतात. म्हणून, चमक कायम ठेवण्यासाठी काही सोप्या पद्धती फायदेशीर ठरू शकतात. 

१) मीठाचा वापर

भांड्यातून जळलेले दूध काढून टाकण्यासाठी मीठ वापरणे हा एक चांगला मार्ग आहे. यासाठी जळलेल्या भांड्यात 2 चमचे मीठ टाका आणि डिश लिक्विडचे काही थेंब जळलेल्या भांड्यात टाका आणि त्यानंतर भांड्यात पाणी घाला, जळालेला भाग पूर्णपणे बुडेपर्यंत पाणी घाला. मग एक तास भिजू द्या. नंतर  चमचा वापरून डाग काढून टाका. मग साबणाने भांडं पूर्णपणे स्वच्छ करा.

२) लिंबाचा वापर

भांड्यावरचे डाग साफ करण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर आहे. जर तुम्ही दुधाचा जळलेला नॉन-स्टिक पॅन साफ ​​करत असाल तर लिंबाचा रस उपयुक्त ठरू शकतो. तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की जळलेल्या  भांड्यावर पुरेश्या प्रमाणात लिंबाचा रस लावा आणि काही काळ सोडा. लिंबाच्या रसामध्ये असलेले आम्ल डाग सहजपणे साफ करेल.

३) बेकिंग सोडा

गॅसवर जळलेला पॅन ठेवा आणि त्यात पांढरा व्हिनेगर घाला. जेणेकरून भांड्याचा जळालेला भाग बाहेर येईल. यानंतर, मिश्रण सुमारे 10 मिनिटे उकळवा आणि नंतर पॅन थंड करत ठेवा. 2 चमचे बेकिंग सोडा गरम पॅनमध्ये घाला. जर तुम्हाला अधिक घट्ट डाग काढायचे असतील तर तुम्ही मिश्रणात जास्तीचा  बेकिंग सोडा घालू शकता. पॅन नीट स्क्रब करा आणि दुधाचे दाग काढून टाकण्याचा प्रयत्न करा.

४)  व्हिनेगर

व्हिनेगर देखील एक उत्तम स्वच्छता एजंट आहे आणि आपल्या दुधाचं भांड साफ करण्यास मदत करू शकते. खराब झालेलं भांडं काही काळ व्हिनेगरमध्ये भिजवा, नंतर कोमट पाण्याने आणि साबणाने धुवा.

५) डिर्टेजंटचा वापर

भांड्यांवरचे जळल्याचे काही डाग असल्यास त्यात एक चमचे डिटर्जंट पावडर घाला आणि पाणी घालून उकळायला ठेवा. जेव्हा पाणी पूर्णपणे उकळेल तेव्हा गॅस बंद करा आणि भांड्याला दोन ते तीन तास किंवा रात्रभर असंच ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी  चमच्याचा वापर करून हे डाग काढून टाका.
 

Web Title: Kitchen Tips : How to clean burnt milk vessel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.