Join us   

मूत्रपिंडाचे विकार टाळा, प्या एक आयुर्वेदिक काढा! किडनी डिटॉक्सचा सोपा घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2024 3:52 PM

Kidney Detox Ayurveda | Ayurvedic Remedies for Healthy Kidney : किडनीचे काम नियमित उत्तम सुरु ठेवण्यासाठी खास उपाय..

किडनी (Kidney Health) शरीराचा महत्वपूर्ण भाग आहे. कारण किडनी आपल्या शरीरात फिल्टरचे काम करते. मुत्रपिंड लघवीद्वारे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते (Kidney Detox). त्यामुळे किडनीचे आरोग्य उत्तम राखणं गरजचं आहे. बऱ्याचदा अयोग्य आहारामुळे किडनीचे आजार निर्माण होतात. त्यामुळे किडनीला वेळोवेळी डिटॉक्स करणं आवश्यक आहे. बाजारात किडनी डिटॉक्सची अनेक औषधे उपलब्ध आहेत. पण बाजरातील प्रॉडक्ट्सचा वापर करण्यापेक्षा आपण घरीच एक काढा तयार करू शकता. या काढाच्या सेवनाने किडनी डिटॉक्ससाठी मदत होईल.

यासंदर्भात, 'कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक' चे संचालक कपिल त्यागी सांगतात, 'खरंतर किडनीला कोणत्याही विशेष डिटॉक्सची गरज नसते. याचे कारण म्हणजे किडनी स्वतःला डिटॉक्स करत राहते. परंतु, बऱ्याचदा मूत्रपिंडात घाण साचते, जी साफ करणे खूप महत्वाचे आहे. यावर उपाय म्हणून आपण आयुर्वेदिक काढा पिऊ शकता(Kidney Detox Ayurveda | Ayurvedic Remedies for Healthy Kidney).

किडनी साफ करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

आयुर्वेदामध्ये शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि आरोग्य उत्तम राखण्यास डेकोक्शनचा वापर केला जातो. किडनी साफ करण्यासाठी आपण आयुर्वेदिक डिकोक्शन करू शकता. पण या काढ्याचा वापर करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. विशेषतः जर आपल्याला मूत्रपिंडाच्या निगडीत समस्या असेल तर, हा काढा घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

उन्हाळ्यात एसी तर लावता पण वीजबिल जास्त येण्याची भीती वाटते? ३ टिप्स- बिल येईल कमी

किडनीसाठी डेकोक्शन तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य

धणे

जिरे

बडीशेप

ओवा

आलं

पाणी

डेकोक्शन तयार करण्याची योग्य पद्धत

सर्वप्रथम, एका पॅनमध्ये २ कप पाणी घ्या. त्यात एक चमचा धणे, जिरे, बडीशेप, ओवा, एक इंच आलं घालून मिक्स करा. साहित्य मध्यम आचेवर शिजवून घ्या. ५ ते १० मिनिटानंतर गॅस बंद करा. नंतर उकळलेलं पाणी एका कपमध्ये काढून घ्या. थोडं थंड झाल्यानंतर त्यात एक चमचा मध घाला. त्याऐवजी आपण लिंबाचा रस देखील घालू शकता. अशा प्रकारे किडनी डेकोक्शन पिण्यासाठी रेडी.

मुत्रपिंड निरोगी ठेवण्याचे इतर मार्ग

- भरपूर पाणी प्या.

- फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या.

ऐन तारुण्यात हाडं ठणकतात? बीपी लो होते? खा ४ प्रकारचे सुपरफुड्स; तारुण्य टिकेल कायम

- वजनावर कण्ट्रोल ठेवा.

- रक्तदाब नियंत्रणात ठेवा.

- अल्कोहोल आणि मिठाचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.

- धूम्रपान टाळा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य