Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पाठीचा कणा ठेवा ताठ! पोक काढून बसायची सवय कायमच बिघडवते पोश्चर, पाहा कशी बदलायची सवय

पाठीचा कणा ठेवा ताठ! पोक काढून बसायची सवय कायमच बिघडवते पोश्चर, पाहा कशी बदलायची सवय

Keep your spine straight! Hunching while walking and sitting might cause serious problems, health tips : पाठ तसेच खांदा वाकवून चालण्याची सवय अगदी वाईट. पाठीला पोक काढल्यामुळे होतात अनेक त्रास.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2025 18:06 IST2025-08-12T18:04:59+5:302025-08-12T18:06:05+5:30

Keep your spine straight! Hunching while walking and sitting might cause serious problems, health tips : पाठ तसेच खांदा वाकवून चालण्याची सवय अगदी वाईट. पाठीला पोक काढल्यामुळे होतात अनेक त्रास.

Keep your spine straight! Hunching while walking and sitting might cause serious problems, health tips | पाठीचा कणा ठेवा ताठ! पोक काढून बसायची सवय कायमच बिघडवते पोश्चर, पाहा कशी बदलायची सवय

पाठीचा कणा ठेवा ताठ! पोक काढून बसायची सवय कायमच बिघडवते पोश्चर, पाहा कशी बदलायची सवय

पाठीला पोक काढून बसण्याची सवय म्हणजेच वाकून बसण्याची सवय. पाठीचा कणा वाकवायचा त्याला वळण द्यायचे आणि खांदे पुढे झुकवून बसायचे. ही अनेकांची दैनंदिन सवय झाली आहे. (Keep your spine straight! Hunching while walking and sitting might cause serious problems, health tips )ऑफिसमध्ये दीर्घकाळ लॅपटॉपसमोर बसणे, मोबाईल हातात घेऊन तासनतास स्क्रोल करत राहणे किंवा आरामात सोफ्यावर बसून काम करणे या सर्वांमुळे ही सवय नकळत लागते. सुरुवातीला ही बसण्याची पद्धत अगदी सोयीची आणि आरामदायी वाटते. पाठीला बरे वाटते. पण हळूहळू ती शरीराच्या नैसर्गिक पोश्चरवर परिणाम करू लागते आणि आरोग्यावर गंभीर दुष्परिणामही करते. 

सतत पाठीला पोक काढून बसल्याने कण्याचा नैसर्गिक आकार बिघडतो. मणक्यांवर ताण येतो ते आपल्याला जाणवतही नाही. हळूहळू दबाव वाढतो.या दबावामुळे मणक्याचे भाग झिजण्याचा वेग वाढतो. ज्यामुळे दीर्घकालीन पाठदुखी, सायटिका, मानदुखी आदी सारख्या समस्या उद्भवू शकतात. पाठीच्या वरच्या भागातील स्नायूंना सतत ताण येतो आणि खालच्या पाठीचे स्नायू कमकुवत होतात. खांदे पुढे वाकल्यामुळे खांद्यांमध्ये स्टिफनेस येतो. तर मान सतत पुढे राहिल्याने टेक्स्ट नेक सारखी समस्या वाढू शकते. या स्थितीमुळे डोकेदुखी, मानदुखी आणि खांदेदुखी वारंवार जाणवू शकते.

चुकीच्या बसण्यामुळे फक्त हाडे आणि स्नायूच नव्हे, तर शरीरातील इतर कार्यप्रणालीवरही परिणाम होतो. पाठ वाकवून बसल्याने छातीचा पिंजरा पूर्णपणे फैलावत नाही, त्यामुळे श्वसनाची क्षमता घटते. फुफ्फुसांना कमी हवा मिळाल्याने ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे थकवा, एकाग्रतेत घट आणि झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते. दीर्घकाळ चुकीच्या पोश्चरमुळे पचनक्रियेवरही परिणाम होतो, कारण पोटावर दाब आल्यामुळे अन्न नीट पचत नाही आणि ऍसिडिटी, अपचन अशा समस्या वाढतात.

पोक काढून बसण्याची सवय वाटते तेवढी साधी नाही. फक्त काही साधे त्रास होतात असे नाही पोक काढून बसण्याची सवय असल्यामुळे माणूस वया नुसार जसा मोठा होतो तसा त्याचा पाठीचा मणका कमकुवत होत जातो. म्हातारपणात पाठीला कुबड येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे बसताना वाकडे तिकडे बसणे टाळा आणि स्वस्थ ताठ बसायची सवय लावून घ्या. 

Web Title: Keep your spine straight! Hunching while walking and sitting might cause serious problems, health tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.