Join us

मुलाचं रोज जंकफूड खाणं वाढवतो कॅन्सरचा धोका, डॉक्टर म्हणतात- ५ पदार्थ मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2025 18:48 IST

dangerous junk foods for kids: cancer risk: doctor warning on kids junk food: आपण रोज खाणारे असे काही पदार्थ आहे ज्यामुळे आपल्याला जीव गमावावा लागू शकतो. त्यासाठी वेळीच सावध व्हायला हवे.

पावसाळ्यात आपल्याला सतत बाहेरचे खावेसे वाटते. रस्त्याच्या कडेला असणारे तळलेले पदार्थ पाहून आपली त्यांना खाण्याची इच्छा होते.(Junk Food side effects) इतकेच नाही तर बदलेल्या जीवनशैलीनुसार आपल्यापैकी अनेकजण वारंवार बाहेरचे खातात. पिझ्झा- बर्गरसारख्या पदार्थांना आपण स्नॅक्स म्हणून नाही तर जेवणात खातो. चवीला टेस्टी लागणारे हे जंकफूड चांगले जरी वाटत असले तरी आरोग्यासाठी धोकादायक आहे.(cancer risk) आपल्या चुकीच्या आहारामुळे आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते. (doctor warning on kids junk food) जंकफूड जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्याला कोलन, फुफ्फुस, प्रोस्टेट आणि गर्भाशयाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असते.(junk food and cancer risk) तसेच जास्त प्रमाणात धूम्रपान आणि मद्यपान न करण्याचा सल्ला देखील डॉक्टर आपल्याला करत असतात. हार्वर्डमधले प्रसिद्ध डॉक्टर सौरभ सेठी म्हणतात की, आपण रोज खाणारे असे काही पदार्थ आहे ज्यामुळे आपल्याला जीव गमावावा लागू शकतो. त्यासाठी वेळीच सावध व्हायला हवे. 

डोळे सांगता कोलेस्टेरॉल वाढण्याची ५ लक्षणे! नियमित खा ' हे ' पदार्थ, हॉर्ट ॲटॅकचा धोका टाळा

1. डॉक्टर म्हणतात की, कर्करोगाचा धोका वाढवण्यासाठी सर्वात खराब आणि वाईट पदार्थ म्हणजे प्रक्रिया केलेले पदार्थ. बाजारात असे अनेक पदार्थ मिळतात जे जास्त काळ टिकवण्यासाठी त्यावर प्रक्रिया केली जाते. यामध्ये मीठ, साखर आणि चरबीचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. 

2. तळलेले पदार्थ हे आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात जास्त हानिकारक असतात. यात असणारे अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ, ससॉफ्ट ड्रिंक्स, चिप्स, चॉकलेट, कँडी, आईस्क्रीम, पॅकेज्ड सूप, फ्राईजसारखे पदार्थ असतात. यामुळे छातीतील जळजळ वाढून कॅन्सचा धोका वाढतो. 

3. साखरेचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास आपल्या मधुमेहाचा आजार तर जडू शकतो पण त्यातसोबत कर्करोगाची भीती देखील वाढू शकते. त्यामुळे साखरेचे पदार्थ खाताना प्रमाणात खा. 

4. गॅस किंवा चुलीवर भाजलेले मांस हे आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे आपल्याला स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. 

5. हार्मोनशी संबंधित कर्करोगांसाठी सर्वात वाईट अन्न म्हणजे अल्कोहोल. हे शरीरातील हार्मोन्सची पातळी खराब करते. तसेच यामुळे किडनी आणि कर्करोगाचा आजार बळावू शकतो. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सकर्करोग