Join us
Daily Top 2 Weekly Top 5

सांधे, हात-पाय दुखणार नाही, महिलांनी 'या' तेलाने करा मालीश, दहा मिनिटांत मिळतो आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2025 11:28 IST

Joints, hands and feet will not hurt, women should massage with this oil, get relief in ten minutes : महिलांसाठी उपयुक्त ठरते तेलाचे मालीश. पाहा काय करायचे.

वयाच्या तीशीनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसू लागतात. प्रेगनंसी, पिरिएड्स, सेक्शुअल लाइफ सगळ्याचाच आरोग्यावर परिणाम होत असतो. हाडांची झीज व्हायला सुरवात होते. त्यासाठी अनेक सप्लिमेंट्सही महिला घेतात. (Joints, hands and feet will not hurt, women should massage with this oil, get relief in ten minutes)त्वचेची तजेलता कमी होऊ लागते, सांधे दुखू लागतात, थकवा वाढतो आणि ताण जाणवू लागतो. अशा काळात शरीराची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरते. यासाठी सर्वात नैसर्गिक आणि प्रभावी उपाय म्हणजे नियमित तेल मालीश. स्वत:च्या हातानेच हळूहळू करताही येते आणि आराम मिळतो.

तेल मालीश केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, स्नायू मोकळे होतात आणि त्वचेला पोषण मिळते. नियमित मालीश केल्यामुळे झोप चांगली लागते, ताण कमी होतो आणि त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. हळूहळू वाढणाऱ्या वयाचा परिणाम शरीरावर कमी जाणवतो. तसेच एकदम रिलॅक्स वाटते. घरच्या आणि ऑफीसच्या कामातून वेळ काढून अगदी २० मिनिटे मसाज करा नक्की फरक जाणवेल. 

महिलांसाठी काही विशिष्ट तेलं अत्यंत उपयुक्त ठरतात. त्यात तीळ तेल सर्वात पारंपरिक आणि प्रभावी मानले जाते. हे हाडांना बळकटी देते आणि शरीराला उबदार ठेवते. खोबरेल तेल हलके आणि थंड प्रवृत्तीचे असल्याने रोजच्या मालीशसाठी चांगले. ते त्वचेला मृदुता आणि तजेलता देते. बदाम तेल जीवनसत्त्व 'ई'ने समृद्ध असून, चेहर्‍याच्या आणि मानेच्या त्वचेसाठी विशेष उपयोगी आहे. ऑलिव्ह तेल म्हणजे जैतून तेल त्वचेला लवचिक ठेवते. तर मोहरी तेल थंड वातावरणात शरीराला उब देते आणि स्नायूंच्या दुखण्यावर आराम करते.

मालीश करताना तेल किंचित कोमट करावे. सकाळी स्नानापूर्वी किंवा रात्री झोपण्यापूर्वी मालीश केल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला दिसतो. हलक्या हाताने गोलाकार हालचालींनी मालीश करावी, जास्त दाब देऊ नये. मालीश झाल्यावर थोडा वेळ तेल शरीरावर राहू द्यावे आणि नंतर कोमट पाण्याने अंघोळ करावी.

नियमित तेल मालीश ही फक्त सौंदर्याची नाही तर आरोग्यासाठीही फार फायद्याची गोष्ट आहे. ४०च्या आसपासच्या महिलांसाठी ही सवय म्हणजे शरीराला ताजेतवाने, निरोगी ठेवणारा एक सोपा घरगुती उपाय आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Massage with these oils for joint pain relief in ten minutes.

Web Summary : Women can relieve joint pain and fatigue with regular oil massages. Sesame, coconut, almond, olive, and mustard oils are beneficial. Warm oil and gentle circular motions are recommended for best results, promoting overall well-being.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समहिलाहोम रेमेडीसोशल व्हायरल