वाढत्या वयानुसार होणारा सांधेदुखीचा त्रास आता, ऐन तरुण वयात देखील होऊ लागला आहे. सांधेदुखी (Joint Pain) ही आजच्या धकाधकीच्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे फारच कॉमन होत चाललेली समस्या आहे. वयोमानानुसार होणारे सांध्यांचे झिजणे, चुकीची बसण्याची-उठण्याची सवय, शारीरिक हालचालींची (Joint Pain Home Remedies) कमतरता, पोषणातील कमतरता किंवा काहीवेळा अपघातामुळेही सांधेदुखीचा त्रास सतावतो. गुडघे, कंबर, मान, खांदे, मनगटे अशा शरीराच्या विविध सांध्यांमध्ये वेदना जाणवतात आणि यामुळे दैनंदिन कामांवर त्याचा (How To Cure Joint Pain Naturally) परिणाम होतो. शरीराच्या (Best Joint Pain Relief) कोणत्याही सांध्यात होणारी वेदना ही केवळ शारीरिक त्रास देणारी नसते, तर यामुळे आपल्याला इतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो(Simple Way to Get Relief from Arthritis Pain Naturally).
सुरुवातीला अतिशय किरकोळ वाटणारी ही समस्या वेळेवर लक्ष न दिल्यास अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे वेळीच सांधेदुखीवर योग्य उपचार घेणे गरजेचे असते. सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी नैसर्गिक व घरगुती उपाय देखील फायदेशीर ठरु शकतात. या घरगुती उपायामुळे सांध्यांची लवचिकता व बळकटी टिकून राहील आणि वेदना कमी होतील. सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी दीपिका पदुकोणची सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शहा यांनी एक खास घरगुती उपाय सांगितला आहे. हा उपाय नेमका काय आहे ते पाहूयात.
साहित्य :-
१. मखाणे - २ कप
२. काजू - ८ ते १० काजू
३. बदाम - ८ ते १० बदाम
४. पिस्ता - ८ ते १० पिस्ता
५. कलोंजी - १ टेबलस्पून
६. भोपळ्याच्या बिया - १ टेबलस्पून
७. सूर्यफुलाच्या बिया - १ टेबलस्पून
८. खडीसाखर - १ टेबलस्पून
दात व हिरड्यांच्या समस्यांवर आजीबाईच्या बटव्यातील उपाय! वापरा घरगुती औषधी दंतमंजन-दात सांभाळा...
अथिया शेट्टी केसांना लावते 'हे' घरगुती तेल! म्हणून तिचे केस दिसतात सुंदर - पाहा तिचा देसी उपाय...
कृती :-
१. सगळ्यातआधी मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात मखाणे, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, खडीसाखर, काजू, बदाम, पिस्ता, कलोंजी असे सगळे जिन्नस एकत्रित करून घ्यावेत.
२. आता हे सगळे जिन्नस एकत्रित मिक्सरच्या भांड्यात वाटून त्याची बारीक पूड तयार करून घ्यावी.
३. ही तयार पावडर एका एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवावी.
ही पावडर नेमकी कशी खावी ?
ग्लासभर गरम दुधात २ टेबलस्पून ही पावडर घालूंन, ही पावडर दुधात व्यवस्थित मिसळून घ्यावी. दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे दूध प्यायल्यास सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.