हार्मोनल इंम्बॅलेन्स म्हणजेच शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडणे हा त्रास कित्येक जणींना सध्या होतो आहे. बदललेली जीवनशैली हे त्यामागचं एक मोठं कारण आहेच. पण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे हा त्रास अनेकींना होतो. पुरुषांमध्येही हार्मोन्सचे संतुलन बिघडते. हा त्रास कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी एक सोपा घरगुती उपाय सांगितला आहे. तो केल्यास हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते, असं तज्ज्ञ सांगत आहेत.(jeera fried rice for avoiding hormonal imbalance)
हार्मोन्स संतुलित राहण्यासाठी उपाय
हार्मोन्स संतुलित राहण्यासाठी काय उपाय करावा, याविषयी तज्ज्ञांनी दिलेली माहिती stpmarathi या पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये ते सांगतात की जिरा फ्राईड राईस हा एक असा पदार्थ आहे जो शरीरातले हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी मदत करतो.
मराठवाडा स्पेशल रेसिपी: तोंडाला चव आणणारा झणझणीत लसणाचा भुरका, महिनाभर टिकणारा पदार्थ
त्यासाठी सगळ्यात आधी एका कढईमध्ये साजूक तूप घाला आणि त्यात तांदूळ सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घ्या. यानंतर कढईतले तांदूळ काढून घ्या आणि त्यात आणखी तूप घालून जिरे परतून घ्या. यानंतर जिऱ्यांमध्ये पाणी आणि परतून घेतलेले तांदूळ घाला आणि ते शिजू द्या. या पद्धतीने केलेला जिरा राईस हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी मदत करतो असं तज्ज्ञ सांगतात.
हे उपायही करा
१. बदललेली जीवनशैली हे हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं एक मोठं कारण आहे. त्यामुळे दररोज किमान ३० मिनिटे तरी व्यायाम करा.
२. खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही खूप बदल झाला आहे. बाहेरचे पदार्थ खाणं टाळा. जंकफूड, मैद्याचे पदार्थ, पॅकफूड हे सगळं बंद करा.
उरलेल्या भातापासून १० मिनिटांत करा खमंग पनीर पुलाव, बोटं चाटत बसाल एवढी टेस्टी रेसिपी..
या पदार्थांमध्ये असणाऱ्या केमिकल्समुळेही स्थुलता येते, शरीरात बदल होतात आणि हार्मोन्सचे संतुलन बिघडते.
३. ताण घेतल्यामुळेही शरीरातल्या हार्मोन्सचे संतुलन बिघडते. यामुळे ताण येणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. किंवा मग तुमचे छंद जोपासा, जेणेकरून त्यात मन गुंतून राहील आणि काही वेळ का असेना पण मनावरचा ताण कमी होईल.
