Join us
Daily Top 2 Weekly Top 5

जपानी लोकांच्या ५ सवयी वाढवतात आयुष्य-हार्ट ॲटॅकही टळतो, ठरवलं तर आपल्यालाही जमेल सहज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2026 15:02 IST

Japanese lifestyle habits that keep the heart healthy : Japanese lifestyle habits for heart health : हार्ट ॲटॅक येऊ न देता दीर्घायुषी राहण्याचे जपानी सिक्रेट! जपानी लोकांच्या या छोट्या ५ सवयी बदलू शकतात तुमचं आयुष्य...

आजकाल हार्ट ॲटॅक आणि हृदयाशी संबंधित आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. बिझी आणि सतत बदलती लाईफस्टाईल, ताणतणाव, जंक फूडचं वाढलेलं प्रमाण आणि व्यायामाचा अभाव यामुळे अगदी तरुण वयातही हृदयविकाराचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे अनेकजण “हृदय निरोगी ठेवण्यासाठी नेमकं काय करावं?” या प्रश्नाचं उत्तर शोधताना दिसतात. अशावेळी जगभरात दीर्घायुष्य आणि हेल्दी लाईफस्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या जपानी लोकांच्या सवयी विशेष लक्ष वेधून घेतात(heart healthy habits of Japanese people).

जपानमधील लोक केवळ आहारच नाही, तर डेली रुटीन मधील काही चांगल्या सवयींमुळेही (Japanese lifestyle habits that keep the heart healthy) आपलं हृदय निरोगी ठेवतात. नियमित हालचाल, संतुलित आहार, मानसिक शांतता आणि शिस्तबद्ध डेली रुटीन यांसारख्या काही साध्या सवयी त्यांच्या हेल्दी हार्टचं सिक्रेट मानल्या जातात. त्यामुळे त्यांच्यामध्ये हृदयविकाराचं प्रमाण तुलनेने कमी असल्याचंही दिसून येत. जर तुम्हालाही तुमचं हृदय निरोगी ठेवायचं असेल आणि हार्ट ॲटॅकचा धोका कमी करायचा असेल, तर जपानी लोकांच्या या ५ चांगल्या (Japanese lifestyle habits for heart health) सवयी जाणून घेणं नक्कीच फायदेशीर ठरू शकतं.

हार्ट ॲटॅकचा धोका कमी करुन हृदय हेल्दी ठेवण्यासाठीच्या ५ सवयी... 

आकाश हेल्थकेअरमधील इंटरनल मेडिसिनचे सिनियर कन्सल्टंट डॉ. प्रभात रंजन सिन्हा सांगतात की, जपानमधील लोकांच्या दीर्घायुष्याचे मुख्य कारण तिथली संस्कृती आहे, जिथे आहार, शारीरिक हालचाल आणि सामाजिक संबंध यांसारख्या निरोगी आणि चांगल्या सवयी त्यांच्या डेली रुटीनचा भाग आहेत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की जपानी लोकांचे दीर्घायुष्य हे केवळ चांगल्या जीन्स मुळेच नाही तर ते त्यांच्या डेली लाईफस्टाईलशी आणि सवयींशी जोडलेले आहे, जे हृदय निरोगी ठेवण्यास, तणाव कमी करण्यास आणि त्यांच्या सर्वांगीण आरोग्यामध्ये सुधारणा करण्यास मदत करतात.

कोणत्या आहेत त्या ५ सवयी ? 

१. हारा हाची बू (Hara Hachi Bu) म्हणजेच पोट ८०% भरेपर्यंत खाणे :- जपानमधील सर्वात प्रसिद्ध आरोग्यदायी सवयींपैकी एक म्हणजे 'हारा हाची बू', ज्याचा अर्थ असा आहे की पोट फक्त ८० टक्क्यांपर्यंत भरा आणि २० टक्के रिकामे ठेवा. कमी खाण्याची ही सवय तुमच्या पचनापासून ते वजनापर्यंत सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवते. डॉ. सिन्हा सांगतात की, ही सवय कोणत्याही कडक डाएटिंगशिवाय कॅलरी नियंत्रित करण्यास मदत करते. कमी कॅलरी घेतल्यामुळे चयापचय (metabolism) सुधारते, लठ्ठपणाचा धोका कमी होतो आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

दात पांढरेशुभ्र आणि हिरड्या मजबूत करणारं दंतमंजन, खिशाला परवडणारा घरगुती सुरक्षित उपाय...

२. प्लांट बेस्ड डाएट करणे :- जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचे सिक्रेट त्यांच्या प्लांट बेस्ड डाएटमध्ये देखील आहे. हे लोक पारंपारिक जपानी आहारात भाज्या, टोफू, समुद्री भाज्या, आंबवलेले पदार्थ जास्त प्रमाणांत खातात. त्यांच्या आहारात प्रोसेस्ड फूडचे प्रमाण फारच कमी असते. डॉ. सिन्हा यांनी सांगितले की, प्लांट बेस्ड फूड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते, जे हार्ट ॲटॅक आणि हृदयविकाराच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. डॉक्टरांनी सांगितले की प्लांट बेस्ड डाएट मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशर सारख्या आजारांचा धोका देखील कमी करते आणि शरीराला दीर्घकाळ निरोगी आणि तरुण ठेवते.

शहाळ्याची मलई खाल्ल्याने खरंच कोलेस्टेरॉल वाढतं का ? डाएटिशियन सांगतात, दिवसाला किती आणि कशी खावी मलई... 

३. कठीण वर्कआऊट नाही, तर रोजचा हलका व्यायाम :- जपानमधील लोक डेली रुटीन मध्ये चालणे, सायकल चालवणे, बागकाम करणे आणि छोटी-छोटी  शारीरिक श्रमाची कामे करणे पसंत करतात, ज्यामुळे त्यांचे शरीर नियमितपणे ॲक्टिव्ह राहते. डॉ. सिन्हा यांनी सांगितले की, नियमित आणि हलका व्यायाम हृदय रोगाचा धोका २० ते ३०% पर्यंत कमी करू शकतो. यामुळे रक्तदाब आणि रक्ताभिसरण देखील सुधारते. तज्ज्ञांच्या मते, खरा फरक सातत्यामुळे पडतो, खूप कठीण व्यायामामुळे नाही. दररोजच्या छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटी किंवा शारीरिक हालचाली भविष्यकाळात आपल्याला जास्त फायदा देतात.

४. इकिगाई (Ikigai) म्हणजेच जीवन जगण्याचा उद्देश :- जपानचा आणखी एक खास विचार म्हणजे 'इकिगाई', ज्याचा अर्थ असा आहे की दररोज सकाळी उठण्याचे एक कारण किंवा जीवनाचा उद्देश असायला हवा. डॉ. सिन्हा सांगतात की मानसिक आणि भावनिक संतुलनाचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. ज्या लोकांच्या जीवनात उद्देश असतो, त्यांच्यामध्ये तणाव कमी असतो आणि कमी तणावाचा संबंध हृदयाच्या चांगल्या आरोग्याशी असतो. दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित गंभीर समस्यांचा धोका वाढू शकतो.

५. चांगले सामाजिक संबंध म्हणजेच मोई (Moai) :- मोई (Moai) चा अर्थ असा जवळचा एखाद्या असा सामाजिक गट आहे जिथे लोक एकमेकांना भावनिक आधार, सोबत आणि जबाबदारीची जाणीव करून देतात. डॉ. सिन्हा यांच्या मते, ज्या लोकांचे सामाजिक संबंध चांगले असतात, त्यांच्या सवयी अधिक चांगल्या असतात, त्यांच्यात स्ट्रेस कमी असतो आणि ते अधिक दीर्घायुष्य जगतात. एकटेपणामुळे हृदयविकाराचा धोका सुमारे ३०% पर्यंत वाढू शकतो. म्हणजेच केवळ योग्य आहार आणि व्यायामच नाही, तर चांगले नातेसंबंध आणि मानसिक शांती देखील हृदय निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

English
हिंदी सारांश
Web Title : 5 Japanese habits for a longer life and heart health.

Web Summary : Japanese people's healthy habits, like mindful eating (Hara Hachi Bu), plant-based diets, light exercise, Ikigai (purpose), and strong social connections (Moai), contribute to heart health and longevity by reducing stress and promoting overall well-being. Adopt these for a healthier heart.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहृदयविकाराचा झटकाहृदयरोग