Join us
Daily Top 2 Weekly Top 5

ब्रेस्टजवळ लाल पुरळ-घामोळं आणि खाजही येते? उन्हाळ्यात महिलांना होणारा त्रास-पाहा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2026 08:25 IST

Itchy and Sweaty breast ? home remedies for keeping breast clean and healthy : छाती जवळ येणारे पुरळ कमी करण्यासाठी उपाय.

महिला त्वचेची काळजी घेतात. चेहर्‍याची त्वचा हाताची त्वचा याची काळजी घेतात. शरीराच्या इतर भागाच्या स्वच्छतेकडे फार लक्ष देत नाहीत. अंघोळ करताना सगळं स्वच्छ झालं असेल असे गृहीत धरतात. मात्र शरीराला अंघोळी व्यतिरिक्तही इतर गोष्टींची गरज असते. (Itchy and Sweaty breast ? home remedies for keeping breast clean and healthy )ती काळजी न घेतल्याने मग खाज सुटणे, रॅश येणे असे त्रास उद्भवतात. महिलांना स्तनांजवळ जास्त खाज सुटते. स्तनांच्या खालचा भाग झाकलेला राहतो. त्या ठिकाणी घामही जास्त येतो. घाम तसाच सुकून जातो. छातीच्या पोकळीतून हात फिरवल्यावर बराच मळही निघतो. घाम, मळ साठून राहिल्याने ऍलर्जी होऊ शकते. त्यामुळे शरीराचे असे भाग जे कायम झाकलेले असतात त्यांची काळजी जरा जास्त घ्यायला हवी. 

१.छातीला खाज सुटण्याची अनेक कारणे असतात. त्यापैकी एक म्हणजे चुकीची ब्रेसियर वापरणे. स्तनांचा आकार छान सुबक दिसावा यासाठी आजकाल विविध ब्रेसियर मिळतात. महिला त्या वापरतात. आणि त्या अति घट्ट असल्याने खाज सुटते. छाती दाबली जाईल अशा घट्ट ब्रेसियर वापरू नयेत. मऊ, चांगल्या दर्जाची आणि अति घट्ट न बसणारी ब्रेसियर वापरा. स्तनांच्या आकारानुसारच ब्रेसियर वापरा.  

२. अंघोळ झाल्यानंतर पावडर लावायची. छाती जवळच्या भागात चांगली भरपूर पावडर लावायची.  छातीला वारा लागू द्यायचा. घरी असताना ब्रेसियर काढून ठेवायची. कायम घालून नाही बसायचे असे केल्याने छातीला त्रास होतो. जरा मोकळे ठेवले म्हणजे खाज येत नाही. छातीलाही बॉडी लोशन लावायचे.

३. उन्हाळ्यामध्ये छातीजवळ खाज सुटून लालसरपणा येतो. उन्हामुळे त्वचा करपते. त्यामुळे असे होते. गुलाब पाण्याचा बोळा छाती जवळून फिरवायचा. असे केल्याने उष्णतेचा त्रास कमी होतो. 

४. डॉ. नुपूर गुप्ता सांगतात, छातीला खाज येणे तसे कॉमन आहे. मात्र कधीतरी कारण वेगळेही असू शकते. उष्णतेमुळे किंवा घामामुळेच खाज येते असे नाही. ऍलर्जीही असू शकते. तसेच जर काही गंभीर आजार असेल तरी असा त्रास होतो. वेळीच डॉक्टरांकडे जाऊन या.

English
हिंदी सारांश
Web Title : Itchy breasts in summer? Causes, remedies, and care tips for women.

Web Summary : Women often neglect breast hygiene, leading to itching and rashes, especially in summer. Wearing the wrong bra, trapped sweat, and allergies are common causes. Use powder, rose water, loose bras, and consult a doctor if needed.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यहोम रेमेडीमहिलास्तनांची काळजी