Join us
Daily Top 2 Weekly Top 5

शिंका आली की एकदाच शिंकता का दोनदा ? अगदी साधी गोष्ट पण देते मोठे संकेत, कारण ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2026 08:40 IST

Is Sneezing continuously fine? see what are the common reasons and remedies : सतत शिंका येत असतील तर त्यामागे असतात विविध कारणे.

शिंक येणे ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. नाकात धूळ, धूर, अॅलर्जी निर्माण करणारे घटक किंवा कोणतीही खाजणारी गोष्ट गेली की शरीर ती बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते आणि त्यातून शिंक येते. (Is Sneezing continuously fine? see what are the common reasons and remedies )म्हणजेच शिंक ही शरीराची संरक्षण करण्याची पद्धत असते. एखाददुसरी शिंक येणे सामान्य असते, पण सतत शिंका येत असतील तर त्यामागे काही कारणे असू शकतात. एकदा शिंका आली की सलग चालूच राहतात. तर मग त्यामागे विविध कारणे असतात.

अॅलर्जी हे सतत शिंका येण्यामागील सर्वात सामान्य कारण मानले जाते. धूळ, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस, जुनी चादर किंवा उशीवरील धूळ यामुळे अनेकांना allergy होऊ शकते. अशावेळी सकाळी सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच शिंका येणे, नाक वाहणे किंवा डोळ्यांत खाज येणे असे त्रास जाणवू शकतात. हवामानातील बदलामुळेही शिंका येऊ शकतात. अचानक थंडीतून गरम ठिकाणी जाणे किंवा एसीमधून बाहेर येणे यामुळे काही लोकांना लगेच शिंका सुरू होतात. पावसाळा आणि हिवाळ्यात हा त्रास अधिक जाणवतो.

सर्दी किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळेही सतत शिंका येऊ शकतात. सर्दीची सुरुवात अनेकदा शिंकांनीच होते. त्यानंतर नाक वाहणे, घसा दुखणे किंवा अंग दुखणे अशी लक्षणे दिसू लागतात. नाकात धूळ, धूर किंवा तीव्र वास गेल्यानेही शिंक येऊ शकते. परफ्यूम, अगरबत्ती, साफसफाईची रसायने किंवा प्रदूषणामुळे काही लोकांना लगेच शिंका सुरू होतात.

यामागे घरातील धूळ, ओलावा किंवा अॅलर्जी कारणीभूत असू शकते. उशी, बेडशीट आणि पडदे स्वच्छ न ठेवल्यास हा त्रास वाढू शकतो. सतत शिंका येत असतील तर शरीराची प्रतिकारशक्ती कमी असणे किंवा sinus चा त्रासही कारणीभूत असू शकतो. काही वेळा नाक बंद होणे, डोके जड वाटणे किंवा चेहऱ्यावर दाब जाणवणे अशी लक्षणेही दिसतात.

शिंका कमी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. घरातील धूळ कमी ठेवणे, बेडशीट आणि उशी नियमित स्वच्छ धुणे, भरपूर पाणी पिणे आणि धूर किंवा तीव्र वास टाळणे उपयोगी ठरू शकते. गरम पाण्याची वाफ घेतल्यानेही आराम मिळू शकतो. मात्र शिंका खूप वाढल्या असतील, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा वारंवार allergy होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. सतत येणाऱ्या शिंका कधी कधी शरीरातील इतर समस्यांचाही संकेत असू शकतात, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नये.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यहोम रेमेडीसोशल व्हायरल