माणसागणिक प्रत्येकाच्या झोपायच्या सवयी या वेगळ्या असतात. काहीजणांना गादीवर झोपायला आवडते तर काहीजण खाली जमिनीवर झोपणे पसंत करतात. बदलत्या काळानुसार आजकाल बहुतेक (Sleeping On The Floor Has Many Benefits You Will Surely Get Good Sleep At Night) लोक गादीवर किंवा बेडवर झोपणेच पसंत करतात. गादीवर किंवा बेडवर (Advantages of sleeping on the floor) झोपल्याने आपल्याला आरामदायक सुखाची अशी झोप (Is sleeping on the floor actually good for you) लागते खरी, परंतु गादीवर झोपल्याने आपल्याला अनेक लहान - मोठ्या शारीरिक समस्या सतावू शकतात.
फार पूर्वी लोक जमिनीवर चटई किंवा पातळ चादर अंथरुन त्यावर झोपत असे. याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. असे असले तरीही अनेकांना या जमिनीवर झोपण्याच्या फायद्यांबद्दल योग्य ती माहिती नसते. सगळ्यांना मऊ, उबदार गादीच झोपण्यासाठी हवी असते. परंतु जमिनीवर झोपण्याचे फायदे वाचाल तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. गादीवर झोपण्याऐवजी जमिनीवर झोपण्याचे फायदे नेमके काय आहेत ते पाहूयात.
जमिनीवर झोपण्याचे फायदे नेमके कोणते ?
१. हाडांची समस्या दूर होते :- जमिनीवर झोपल्याने वाकडी-तिकडी झालेली हाडे नैसर्गिक स्थिती येतात आणि त्यांच्या संरचनेत सुधारणा होते. ही प्रक्रिया फार हळू गतीने होते पण भविष्यात याचे अनेक फायदे बघायला मिळू शकतात. खाली जमिनीवर झोपल्याने हाडांच्या जॉइंट्समध्ये काही इजा झाली असेल तर ती सुद्धा याने बरी होऊ शकते.
२. रक्ताभिसरण सुधारते :- कठीण पृष्ठभागावर झोपल्याने शरीरावर एकसमान दाब पडतो. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंचा कडकपणा कमी होतो.
खूप वर्ष सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानं स्तनांचा आकार वाढतो का? स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...
३. पाठीचा कणा सरळ राहील :- मऊ गाद्या अनेकदा पाठीच्या कण्याच्या नैसर्गिक स्थितीत अडथळा आणतात, तर जमिनीवर झोपल्याने पाठीचा कणा सरळ राहतो. यामुळे पाठ आणि कंबरदुखीपासून आराम मिळतो.
४. बॉडी पोश्चर चांगलं होतं :- जमिनीवर झोपल्याने तुमच्या स्नायूंवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त दबाव पडत नाही. तसेच हाडेही नैसर्गिक स्थितीमध्ये असतात. बेडवर किंवा मुलायम गादीवर झोपल्याने तुम्हाला चांगलं तर वाटतं पण त्याने बॉडी पोश्चर बिघडू शकतो. पण जमिनीवर एका चादरीवर झोपल्याने बॉडी पोश्चर चांगला राहतो.
मासिक पाळी दरम्यान पिरिएड्स पॅंटी वापरणे योग्य की अयोग्य ? तज्ज्ञ सांगतात यामागची खरीखुरी कारणं...
५. पाठदुखी दूर होते :- जमिनीवर झोपल्याने पाठीचा कणा सरळ एका रेषेत राहत असल्याने शरीरात रक्तप्रवाह योग्यप्रकारे होतो. आणि हळूहळू पाठदुखीच्या त्रासातून सुटका मिळते. चुकीच्या पद्धतीने झोपल्यास किंवा जाड गादीवर झोपल्याने अनेकांना पाठदुखीचा त्रास होत असतो. याउलट खाली जमिनीवर झोपल्याने ही समस्या होणार नाही.
६. हिप्स आणि खांद्यासाठी फायदेशीर :- जमिनीवर झोपल्याने हिप्स आणि खांद्यांचं अलायमेंट चांगलं होतं आणि शरीरातील अनेकप्रकारचं दुखणं दूर होतं. जर तुमच्या खांद्यामध्ये, मानेमध्ये सतत वेदना होत असतील तर जाड गादीवर झोपण्यापेक्षा खाली जमिनीवर झोपणे सुरु करा. काही दिवसातच याचा तुम्हाला फायदा दिसेल.