आपल्या रोजच्या आहारात मैद्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. (Maida side effects) बेकरी प्रॉडक्ट्स, पिझ्झा, बर्गर, नूडल्स , समोसा, केक आणि बिस्किट्स आपण जास्त खातो. पण या सगळ्यांमध्ये सामान्य आणि समान असणारा घटक म्हणजे मैदा.(Maida health risks) पांढरा, मऊ आणि दिसायला निरुपद्रवी वाटणारा हा पदार्थ खरंतर आपल्या शरीरासाठी विष आहे.(Maida vs wheat flour) मैदा म्हणजे गव्हातील तत्व काढून तयार होणार पदार्थ. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन्ससारखे पोषणघटक पूर्णपणेनष्ट होतात. उरतो तो फक्त स्टार्च आणि रसायनांनी भरलेला पांढरा पावडरी पदार्थ.(Maida health problems) याचा रंग आणि पोत सुधारण्यासाठी बेंझॉयल पेरोक्साइड आणि क्लोरीन वायूसारखे ब्लीचिंग एजंटचा वापर केला जातो. जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होतो. पोट दुखते किंवा पचनसंस्थेवर परिणाम होतो. आतड्यांमध्ये गेल्यावर मैदा चिकटतो. ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लतासारख्या समस्या उद्भवतात. याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. याचा सगळ्यात जास्त परिणाम मधुमेहींच्या रुग्णांवर होतो.
आपण जर रोज मैद्याचे पीठ खाल्ले तर शरीरातील चरबी झपाट्याने वाढते. पोट आणि कंबरेभोवती लठ्ठपणा आणि चयापचय विकार होतात. तसेच खराब कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स वाढून हृदयविकाराचा धोका वाढतो. मैद्याच्या पीठात कोणतेही पोषक तत्व किंवा फायबर नसते. ते फक्त कॅलरीज प्रदान करते. ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती हळूहळू कमकुवत होते.
मैद्याचे पीठ जड आणि आम्लयुक्त असते. जे पचनक्रिया मंदावते आणि शरीरात विष तयार होते. ज्यामुळे कफ दोष वाढतो. लठ्ठपणा, मधुमेह आणि सांधेदुखीसारखे आजार होतात.
मैद्याऐवजी आपण गव्हाचे पीठ, मल्टीग्रेन पीठ, बार्ली, ओट्स, बेसन आणि कॉर्न फ्लोअरसारख्या पीठाचे सेवन करायला हवे. यात फायबर, प्रथिने आणि खनिजे भरपूर असतात.
