Join us

डायबिटीस असणाऱ्यांनी दिवसाची सुरुवात इंस्टंट कॉफी पिऊन केली तर? डॉक्टरांचा 'हा' सल्ला वाचाच... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2025 12:42 IST

Should Diabetic Patients Drink Coffee in the Morning?: मधुमेह असणारे बरेच लोक दिवसाची सुरुवात गरमागरम कॉफी पिऊन करतात. हे कितपत योग्य आहे बघुया...(Is it okay to start your day with instant coffee?)

ठळक मुद्दे आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दिवस उजाडला की आपण अंथरुणातून उठतो खरे.. पण आपल्या दिवसाची खरी सुरुवात मात्र तेव्हाच होते जेव्हा गरमागरम चहाचा किंवा कॉफीचा कप समोर येतो आणि आपण त्याचा आस्वाद घेतो. अशा पद्धतीने एखादा कप चहा किंवा कॉफी रिचवल्याशिवाय एनर्जी येत नाही. भारतातल्या बहुतांश लोकांचं हेच रुटीन आहे. सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत तर ठीक आहे, पण अशा पद्धतीने इन्स्टंट कॉफी पिऊन दिवसाची सुरुवात करणं मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी कितपत योग्य असू शकतं (Should Diabetic Patients Drink Coffee in the Morning?) याविषयी तज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती पाहाच..(Is it okay to start your day with instant coffee?)

 

आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी दिवसाची सुरुवात इन्स्टंट कॉफी पिऊन करावी की नाही याविषयी माहिती दिली आहे.

पंजाबी कुडी बनून आलेल्या प्रिटी झिंटाची मोहक अदा!! तिच्या फुलकारी ओढणीची खास बात अशी की....

ते म्हणतात की दिवसाची सुरुवात इन्स्टंट कॉफीने करणं मधुमेहांसाठी चुकीचं ठरू शकतं. या लोकांना जर दिवसाच्या सुरुवातीलाच कॉफी प्यायची असेल तर कॉफी बियांची पावडर उकळून जी कॉफी केली जाते, ती कॉफी प्या.. शिवाय या पद्धतीने कॉफी करताना त्यात साखर, मध, गूळ असे कोणतेही गोड पदार्थ घालू नका. 

 

अशा पद्धतीची जर तुम्ही कॉफी प्यायली तर दिवसाची सुरुवात जास्त आरोग्यदायी होऊ शकते. या पद्धतीची कॉफी दिवसातून तुम्ही दोन- तीन वेळाही घेऊ शकता.

लग्न समारंभात गळ्यात हवंच ठसठशीत भरीव मंगळसूत्र- बघा मोठ्या मंगळसूत्रांचे ८ सुंदर डिझाईन्स

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी कॉफी पिण्यापूर्वी या गोष्टींचा विचार तर करायलाच हवा, पण ज्या लोकांना मधुमेह नाही त्यांनीही दिवसाची सुरुवात गोड इन्स्टंट कॉफीने करावी की नाही याविषयी एकदा तज्ज्ञांचे मत जरूर जाणून घ्यावे 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेह