Join us

भजी-वडे तळून उरलेलं तेल पुन्हा वापरणं योग्य की अयोग्य? तळलेल्या तेलाचं करायचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2023 14:55 IST

Is it OK to reuse oil after deep frying? तळलेलं तेल पुन्हा वापरावं की फेकून द्यावं? आरोग्यासाठी कोणते तेल चांगले? तज्म सांगतात..

भजी-वडे-पापड असे तळलेले पदार्थ घरोघर लोकांना आवडतात. पदार्थ तळण्यासाठी तेल अधिक प्रमाणावर लागते. पण ते तेल एका वापरात संपत नाही. त्यामुळे तळलेल्या, उरलेल्या तेलाचे काय करावे असा प्रश्न अनेकींना पडतो. महागडे तेल फेकवत नाही आणि तळलेले तेल दिव्यालाही कुणी वापरत नाही. मग उपाय काय? त्या तेलाचा वापर अनेकजणी फोडणीसाठी किंवा चपाती बनवण्यासाठी करतात. पण तळलेले तेल असे पुन्हा पुन्हा वापरावे का? तज्ज्ञ काय सांगतात त्यामागचं शास्त्र?(Is it OK to reuse oil after deep frying?).

अपोलो हॉस्पिटलच्या मुख्य क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. प्रियंका रोहतगी सांगतात, ''स्वयंपाकाच्या तेलात तीन प्रकारचे फॅटी ऍसिड असतात. शॉर्ट चेन फॅटी ऍसिडस्, मीडियम चेन फॅटी ऍसिडस् आणि लॉन्ग चेन फॅटी ऍसिडस्. घरात वापरण्यात येणारे तेल शॉर्ट चेन फॅटी ऍसिड असते. जेव्हा आपण कढईत तेल गरम करतो, तेव्हा शॉर्ट चेन फॅटी ऍसिड तुटण्यास सुरवात होते. जेव्हा त्याचे बॉन्ड तुटू लागते. तेव्हा हवेतील ऑक्सिजन आणि हायड्रोजन त्याची जागा घेऊ लागतात. हा ऑक्सिजन शॉर्ट चेन फॅटी ऍसिडऐवजी, ऑक्साईड तयार करण्यास सुरवात करतो.

हा ऑक्साईड आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. ऑक्साईड शरीरातील पेशी पोकळ बनवू लागतो. त्यामुळे पेशींमध्ये फ्री रॅडिकल्स तयार होऊ लागतात. ज्यामुळे आपल्या शरीरात इंफ्लमेटरी डिसऑर्डर्स, हृदयाशी निगडीत समस्या आणि कॅन्सरसारख्या गंभीर समस्यांना जन्म देतात.''

फ्री रॅडिकल्समुळे होणारे रोग

''जेव्हा आपण गरम तेल पुन्हा गरम करतो, तेव्हा त्यात अधिक प्रमाणावर बॅड फॅटी ऍसिड निर्माण होते, ज्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स वाढते. फ्री रॅडिकल्समुळे शरीरात ऑक्सिडेशन प्रक्रिया खूप वेगवान होते. म्हणजेच पेशींमध्ये सूज किंवा जळजळ होऊ लागते. पेशींमध्ये जळजळ वाढल्याने कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, उच्च बीपी, स्ट्रोक, लठ्ठपणा इत्यादींचा धोका अनेक पटींनी वाढतो.

अंग मोडतंय? असह्य त्रास होतो? नसांचा कमकुवतपणा दुर्लक्ष करू नका, ५ व्हिटॅमिन्सचा आहारात समावेश करा

मग काय करावे

''आपण तेल अधिक वेळ गरम करून, त्यात सतत पदार्थ तळत असतो. ज्यामुळे तेल पूर्णपणे खराब होते. हे तेल इतर पदार्थ बनवण्यासाठी वापरणे योग्य नाही. विशेषतः आपण शॉर्ट चेन फॅटी ऍसिड तेल वापरत असाल तर पुन्हा वापरू नका. खोबरेल तेल, तूप, लोणी, शुद्ध तेल इत्यादींमध्ये शॉर्ट चेन फॅटी ऍसिड आढळते. जे उच्च तापमानात लगेच खराब होते. तेलात पदार्थ तळत असताना लो किंवा मिडीयम फ्लेमवर ठेऊन तळा. जर तेल उरले की, त्याचा वापर आपण फोडणीसाठी करू शकता.

स्ट्रेस वाढल्याने खरंच वजन वाढतं का? तणाव आणि वजनाचे कनेक्शन काय? तज्ज्ञ सांगतात..

अन्न शिजवण्यासाठी या तेलाचा वापर करू नका

वनस्पती तेल, मारगारीन, तूप, खोबरेल तेल, पाम तेल इत्यादी तेल डीप फ्राईडसाठी वापरू नये.

दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम तेल

मोहरीचे तेल, राइस ब्रान, ऑलिव्ह तेल, मोनोसॅच्युरेटेड तेलांचा वापर करू शकता. दररोज १५ मिली तेल वापरणे योग्य राहेल. तेल बदलत राहा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य