Join us
Daily Top 2 Weekly Top 5

सिझेरियनवेळी मणक्यात इंजेक्शन दिलं म्हणूनच महिलांची पाठ दुखते का? डॉक्टर सांगतात बायकांचं कुठे चुकतं... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2025 16:48 IST

Health Tips: सिझेरियन करताना मणक्यात इंजेक्शन दिलं म्हणूनच आपल्यामागे पाठदुखी लागली असं तुम्हालाही वाटतं का? (C section delivery is really responsible for back pain in women?)

ठळक मुद्दे महिलांच्या पाठदुखीमागे खरंच सिझेरियनच्यावेळी दिलेलं इंजेक्शन हे मुख्य कारण असतं का?

हल्ली महिलांनी सहनशक्ती कमी झाल्यामुळे किंवा अगदी बाळंतपणाच्या आधी काही शारिरीक समस्या निर्माण झाल्यामुळे सिझेरियन करून डिलेव्हरी करावी लागते. हे प्रमाण सध्या खूप वाढलं आहे. साधारण पहिलं बाळंतपण झालं की त्यानंतर पुढच्या काही वर्षांत कित्येक महिलांना पाठदुखीचा त्रास सुरू होतो. पाठदुखी व्हायला लागली की बहुतांश महिला याच निष्कर्षावर येतात की आपली सिझेरियन डिलिव्हरी झाली. त्यावेळी भूल देण्यासाठी मणक्यात जे इंजेक्शन दिलं हाेतं, त्यामुळेच आपल्यामागे पाठदुखीचा त्रास लागला आहे. खरंच पाठदुखीमागे सिझेरियनच्यावेळी दिलेलं इंजेक्शन हे मुख्य कारण असतं का? (C section delivery is really responsible for back pain in women?)

 

महिलांच्या पाठदुखीमागे सिझेरियनच्यावेळी दिलेलं इंजेक्शन हे मुख्य कारण असतं का?

महिलांच्या पाठदुखीमागची नेमकी काय कारणं असू शकतात, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी aai_hospital या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये डॉक्टर सांगतात की एरवीही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तुम्हाला कधी ना कधी इंजेक्शन घ्यावं लागलेलंच असेल..

कोलेस्टेराॅल, ट्रायग्लिराईड तपासता; पण 'या' तपासण्यांकडे दुर्लक्ष करता? हार्ट ॲटॅकचा धोका टाळायचा असेल तर..

ती तुमची इंजेक्शनची जागा किंवा त्याच्या आजुबाजुला असणारी हाडं नंतर कधीही दुखत नाहीत. तसंच सिझेरियनच्यावेळी दिल्या जाणाऱ्या इंजेक्शनचंही आहे. महिलांची पाठ त्या इंजेक्शनमुळे दुखत नाही. तर त्यासाठी पुढे सांगितलेली काही कारणं जबाबदार आहेत..

 

बहुसंख्य महिलांची पाठ का दुखते?

१. गरोदरपणादरम्यान पोट जड होतं. बसताना, उठताना, चालताना त्याचा काही ना काही भार पाठीवर येतो. यामुळे नऊ महिन्यात कित्येक महिलांचं बॉडी पोश्चर बदलून जातं. चुकीच्या पोश्चरमुळेही कित्येकींना नंतर पाठदुखीचा त्रास होतो.

फुटबॉलसारखे टम्म फुगलेले टिपिकल पंजाबी भटूरे करा कमी तेलात, पाहा मस्त पारंपरिक भटूरे करण्याची नवी रीत

२. याशिवाय बाळंतपणानंतर ब्रेस्ट फिडिंग करताना कित्येक महिला चुकीच्या पोझिशनमध्ये बसतात. खाली वाकून बसतात, पाठीला आधार देत नाही. या केसेसमध्येही पाठीवर ताण येतो आणि पाठदुखी मागे लागते.

३. गरोदरपण, बाळंतपण आणि त्यानंतरही पुढे जर महिलांच्या आहारात सातत्याने कॅल्शियमची कमतरता असेल तर त्याचा परिणाम म्हणूनही पाठदुखी सुरू होते. त्यामुळे बाळंतपणानंतर ३ महिने तरी डॉक्टरांनी दिलेलं कॅल्शियम सप्लिमेंट घ्यायलाच हवं.   

English
हिंदी सारांश
Web Title : Back pain after C-section: Is the injection to blame?

Web Summary : Back pain after C-sections is often blamed on the injection. Doctors clarify posture, breastfeeding positions, and calcium deficiency are more likely culprits. Maintaining good posture and proper nutrition are key.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समहिलापाठीचे दुखणे उपाय