Join us

सकाळी ब्रशही न करता पाणी पिणे योग्य की अयोग्य? तज्ज्ञ सांगतात, काय खावे-प्यावे आणि कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2023 10:51 IST

Is It Alright To Drink and Eat Without Brushing Your Teeth? सकाळी ब्रश न करता काही खाणेपिणे चांगले की वाईट?

सकाळचा आहार हा खूप महत्वाचा असतो. यात पोषक तत्वांनी परिपूर्ण अशा पदार्थांचा समावेश असायला हवा. अनेक लोकं सकाळी ब्रश न करता पाणी किंवा चहा पितात. परंतु, सकाळी तोंड न धुता कोणते पदार्थ खायला हवे? कोणते पदार्थ टाळायला हवे? हे माहित असणं गरजेचं आहे. आयुर्वेदात देखील ब्रश न करता पाणी पिणे यासह विशिष्ट पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.

यासंदर्भात, आरोग्य हेल्थ सेंटरचे आयुर्वेदिक डॉ. एस.के. पांडे म्हणतात, "आयुर्वेदात, पूर्वीपासून ब्रश न करता पाणी पिणे, यासह इतर पदार्थ खाण्यास सल्ला दिला जातो. परंतु, ब्रश न करता काही गोष्टी खाणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.' ब्रश न करता कोणते पदार्थ खायला हवे, कोणते टाळायला हवे पाहूयात(Is It Alright To Drink and Eat Without Brushing Your Teeth?).

लसूण

तोंड न धुता लसूण खाल्ल्याने, पोट आणि आरोग्याच्या निगडीत अनेक समस्या सुटतात. लसूण नियमित खाल्ल्याने कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि रक्तातील लिपिड लेवल कमी होते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. यासह पोट आणि आतड्यांसाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे रोज सकाळी नियमित लसणाच्या २ पाकळ्या खा.

चपात्या उरल्या तर शिळ्या चपात्या खाव्या का? तज्ज्ञ सांगतात, शिळी चपाती नेहमी खात असाल तर..

गुळ

रिकाम्या पोटी गुळाचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. नियमित ब्रश न करता, कोमट पाण्यात गुळ मिसळून प्यायल्याने शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. सोबत अॅसिडिटीच्या समस्येपासूनही आराम मिळतो. जर आपण मुळव्याधीचे रुग्ण असाल तर, रोज सकाळी कोमट पाण्यासोबत गुळ खा.

मनुके

सकाळी रिकाम्या पोटी मनुके खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. यासह पोषक तत्वांचा पुरवठाही होतो. यासाठी मनुके रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. व सकाळी ब्रश न करता याचे सेवन करा. यामुळे अशक्तपणा, पोट आणि पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल.

रोज सकाळी १ ग्लास कोमट पाणी पिण्याचे ५ फायदे, वजन कमी-त्वचेवर ग्लो हवा तर..

बदाम

बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी ब्रश न करता रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाल्ल्याने, डोळे आणि हृदयाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. बदामामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन ई, ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटक असतात. याचे नियमित सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

पाणी

अनेक जणांना सकाळी तोंड न धुता पाणी पिण्याची सवय असते. ही सवय आयुर्वेदानुसार चांगली मानली जाते. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. मुख्य म्हणजे पोट साफ राहते. मात्र, रिकाम्या पोटी पाणी आणि इतर पदार्थ खाण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य