पित्ताचा त्रास हा शरीरातील उष्णता वाढल्यामुळे, अति मसालेदार-तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा पचनशक्ती असंतुलित झाल्यामुळे होतो. पित्त वाढले की छातीत जळजळ, तोंड कडू होणे, अंग गरम जाणे, डोकेदुखी, चिडचिड, भूक मंदावणे आणि उलट्या होणे असे त्रास होतात. याहून जास्त त्रासही होऊ शकतात. पित्त अंगावर उठते. (Is increased acidity causing problems? Just make simple changes in your diet, you won't have to take a single pill.)त्यामुळे शरीरावर पुरळ येते. प्रचंड खाज सुटते आणि असह्य त्रास होतो. यामुळे दैनंदिन कार्यात अडथळा येतो आणि पचनसंस्थेवर ताण वाढतो. योग्य आहार-पद्धती ठेवली तर पित्त सहज नियंत्रणात ठेवता येते.
पित्ताच्या त्रासात आहार शक्य तितका थंडावा देणारा, हलका आणि पचायला सोपा असेल असाच घ्यावा. दही, ताक, नारळपाणी, उसाचा रस, मठ्ठा, काकडी, खरबूज, पपई, भोपळा, पडवळ, दुधी, मोसंबी, डाळिंब यांसारखी फळे आणि भाज्या उपयुक्त ठरतात. गव्हाचे पदार्थ आहारात असावेत. भारतात रोज पोळी, रोटी खआण्याची पद्धत आहे. कारण त्याचा पोटाला फायदा असतो. तसेच मूगडाळ, उडदाची डाळ, चणाडाळ, मसूरडाळ यांचा आहारात समावेश असायलाच हवा. फक्त ते बाधू नये यासाठी त्यावर चमचाभर तूप घ्यायचे. उकडलेले किंवा वाफवलेले पदार्थ पोटाला आराम देतात. मसालेदार, आंबट, तिखट, तेलकट, गरम आणि जड पदार्थ खाताना काळजी घ्यावी. भरपूर पाणी प्यावे. विशेषतः मिरची, गरम मसाला, तळलेले पदार्थ, कॉफी, कोल्डड्रिंक, फास्ट फूड, व्हिनेगर आणि गरम-कोरड्या स्नॅक्सपासून दूर राहिल्यास पित्त कमी होते. जेवण वेळेवर करणे, उपाशी न राहणे आणि थोड्या थोड्या वेळाने हलका आहार घेणे हा चांगला नियम आहे. पित्त अति खाण्याने नाही तर उपाशी राहिल्याने त्रास देतं. त्यामुळे खाण्याच्या वेळा जपा.
उलट्या होत असतील किंवा उलट्या होण्याची भावना असेल तर काही सोपे उपाय त्वरित आराम देतात. कोमट पाणी किंवा नारळपाणी छोटे घोट घेत राहिल्यास शरीरातील ताण कमी होतो. आलं घातलेले पाणी, जिरे-धणे उकळून केलेला काढा, मध-लिंबू मिसळून घेतलेले कोमट पाणी हे पचन शांत ठेवतात. तूप कोमट पाण्यातून घेणे. तसेच भातात मिसळून खाल्ल्यासही उलट्यांचा त्रास कमी होतो. जड अन्न, तळलेले पदार्थ आणि जास्त प्रमाणात लिंबू किंवा आमटी-रस्सा यांसारखे आंबट पदार्थ टाळावेत. नियमित आहार, पुरेशी पाण्याची मात्रा आणि शांत पचनशक्ती राखली तर पित्ताचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होतो. शरीराचा स्वभाव समजून, हलके-थंड पदार्थ खा.
अंगावर पित्त उठत असेल तर आहारात आमसूल असायलाच हवे. तसेच अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाचा पाला, तुळस, आमसूल असेल तर अंगावरील पुरळ लवकर कमी होते.
