अतिप्रमाणात खाल्लं, जेवण झालं, पोट फुगलं किंवा छातीत जळजळ होऊ लागली की आपल्याकडे पहिली पसंती असते ती म्हणजे कोल्ड ड्रिंक किंवा सोड्याला.(bloating and acidity) एक थम्स-अप प्यायली की ढेकर येईल आणि सगळा गॅस निघून जाईल, हा आपल्याकडचा अत्यंत सामान्य समज आहे. पण ज्या कोल्ड ड्रिंकला आपण औषध समजून पितो. तेच आपल्या पोटाच्या समस्यांचे मोठं कारणं बनतात. (cold drinks side effects)
पण, तुम्हाला माहित आहे का? ज्या कोल्ड ड्रिंकला तुम्ही 'औषध' समजून पिताय, तेच तुमच्या पोटाच्या समस्यांचे मूळ कारण ठरू शकते.(digestive system damage) अनेकांना असं वाटते की, कोल्ड ड्रिंक प्यायल्यावर ढेकर येते, त्याने पोटातील गॅस बाहेर पडतो आणि आराम मिळतो. कोल्ड ड्रिंक प्यायल्यानंतर नेमकं काय होते पाहूया.
'गरिबांचे अन्न' म्हणून हिणवलेले ‘हे’ ७ पदार्थ आता मिळतात फाइव्ह स्टार हॉटेलात, खाण्यासाठी लोक दिवाने
दिल्लीतील प्रसिद्ध सर गंगा राम रुग्णालयातील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. अनिल अरोरा म्हणतात गॅस आणि ॲसिडिटी कमी करण्यासाठी कोल्ड ड्रिंक पिणे हा अत्यंत चुकीचा मार्ग आहे. या पेयांमध्ये शरीराला फायदेशीर ठरेल असे काहीही नसते. जेव्हा आपण कोल्ड ड्रिंक पितो, तेव्हा त्यातील कार्बन डायऑक्साइड वायू पोटात जातो. तोच वायू ढेकर वाटे बाहेर येतो. ही ढेकर तुमच्या पोटातील मूळ गॅस नसून तुम्ही बाहेरून घेतलेला वायू असतो. यामुळे तात्पुरते समाधान वाटते, पण पोटातील मूळ समस्या तशीच राहते.
कोल्ड ड्रिंक्समध्ये भरपूर साखरेचे प्रमाण असते. यात विविध प्रकारचे आम्ल, फ्लेवर्स आणि रसायने असतात. ही रसायने थेट आपल्या पोटाच्या आतड्यांना आणि लिव्हरला नुकसान पोहचवण्याचे काम करतात. नियमितपणे कोल्ड ड्रिकंचे सेवन केल्याने पोटातील नैसर्गिक आम्लाचे संतुलन बिघडते. ज्यामुळे आपल्याला ॲसिडिटी आणि पचनाच्या समस्या जास्त प्रमाणात होतात.
आपल्याला वारंवार गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर कोल्ड ड्रिंक पिण्याऐवजी कोमट पाणी प्यायल्या हवे. यामुळे पचनक्रिया वेगाने होते. ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पोटाला थंडावा देतात. नारळ पाणी हे पोटातील आम्लता कमी करण्यास मदत करते. आले किंवा ओवा हे गॅसवर नैसर्गिक रामबाण उपाय आहेत.
