Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > अति जागरणामुळे कमी वयात झरझर वाढतेय बीपी? तज्ज्ञ म्हणतात, 'सायलेंट किलर'चा आजार- शांत झोपेसाठी उपाय

अति जागरणामुळे कमी वयात झरझर वाढतेय बीपी? तज्ज्ञ म्हणतात, 'सायलेंट किलर'चा आजार- शांत झोपेसाठी उपाय

high BP in young age: sleep disorders and blood pressure: कमी झोप घेतल्यामुळे बीपी कसा वाढतो, जाणून घेऊया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2025 13:37 IST2025-05-20T13:36:57+5:302025-05-20T13:37:57+5:30

high BP in young age: sleep disorders and blood pressure: कमी झोप घेतल्यामुळे बीपी कसा वाढतो, जाणून घेऊया.

Is BP increasing rapidly at a young age due to excessive wakefulness? Experts say, 'Silent Killer' disease - Remedy for restful sleep | अति जागरणामुळे कमी वयात झरझर वाढतेय बीपी? तज्ज्ञ म्हणतात, 'सायलेंट किलर'चा आजार- शांत झोपेसाठी उपाय

अति जागरणामुळे कमी वयात झरझर वाढतेय बीपी? तज्ज्ञ म्हणतात, 'सायलेंट किलर'चा आजार- शांत झोपेसाठी उपाय

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत कामाचा वाढता ताण, झोपेची कमतरता, सतत जंकफूड आणि कॅफिनचे सेवन केल्याने त्याचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.(high BP in young age) पुरेशी झोप घेतली नाही की, आपल्या डोळ्यांवर अधिक ताण येतो. (sleep problems in youth)
तज्ज्ञांच्या मते आपल्याला असे वाटते की कमी झोप घेतल्याने आरोग्यावर परिणाम होत नाही तर चांगली झोप न मिळाल्याने रक्तदाब वाढू शकतो.(sleep and hypertension) उच्च रक्तदाब हा सायलेंट किलरचा आजार आहे. हा हळूहळू गंभीर आरोग्याची समस्या निर्माण करु शकतो. झोपेमुळे बीपी कसा वाढतो, जाणून घेऊया. (sleep disorders and blood pressure)

प्रिती झिंटाचा फिटेनस फंडा! वयाच्या पन्नाशीतही दिसायचे तरुण तर करा 'या ' गोष्टी तिच्यासारख्या

उच्च रक्तदाबाची समस्या ही फक्त वयोवृद्धांमध्येच नाही तर तरुणांमध्ये सगळ्यात जास्त पाहायला मिळते. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत वेळेवर झोप न मिळणे आणि झोपेची गुणवत्ता कमी असणे यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले शरीर दुरुस्त आणि पुनर्प्राप्त होण्यास सुरुवात करते. आपल्याला शरीरावर ताण आल्यावर हार्मोन्स, कोलेस्टेरॉल आणि  एड्रेनालिनवर परिणाम होतो. कमी झोप घेतली किंवा वारंवार झोपेतून जागे झालो तर हार्मोन्स जास्त तयार होतात. त्यामुळे सतत ताणामुळे रक्तदाब हळूहळू वाढू लागतो. 

झोप आणि उच्च रक्तदाब याचा खोल संबंध आहे. जे लोक दिवसातून सहा तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. त्यासाठी पुरेशी झोपच नाही तर त्याची गुणवत्ता देखील तितकीच महत्त्वाची ठरते. झोपेत सतत अडथळे किंवा स्लीप एपनिया सारखा झोपेचा विकार असेल तर चांगल्या झोपेदरम्यान होणारा रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी होत नाही. यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्या सतत दबाखाली असतात. 

व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे पायांना भेगा पडतात? ४ उपाय- मलम न लावता पाय होतील मऊ

कमी झोप घेतल्याने हृदयरोग, चयापचय विकार आणि लठ्ठपणा यासारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढतो. चांगली झोप केवळ थकवाच दूर करत नाही तर आपल्याला आरोग्याला निरोगी ठेवण्यास मदत करते. 

शांत झोप घेण्यासाठी उपाय 

1. शांत झोप घेण्यासाठी झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. 

2. झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम कमी करा. मोबाइल-लॅपटॉपचा निळा प्रकाश आपल्या झोपेमध्ये अडथळा निर्माण करतो. झोपण्याच्या एक तासाआधी स्क्रीन टाइमपासून दूर रहा. 

3. झोपताना वातावरण शांत असायला हवे. खूप गोंधळ किंवा हवाबंद खोली असेल तर झोपण्यास व्यत्यय येतात. 

4. झोपण्यापूर्वी कॅफिन, अल्कोहोल किंवा न पचणारे अन्न खाऊ नका. यामुळे झोपेत अडचणी येतील. 

5. नियमित व्यायाम करा. आपले शरीर जितके जास्त सक्रिय असेल तितकीच लवकर आणि शांत झोप आपल्याला लागते. 


 

Web Title: Is BP increasing rapidly at a young age due to excessive wakefulness? Experts say, 'Silent Killer' disease - Remedy for restful sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.