Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > २ मिनिटांत तयार होणारे ओट्स पौष्टिक म्हणून खाता पण खरंच हेल्दी नाश्ता करताय की जंक ढकलताय पोटात?

२ मिनिटांत तयार होणारे ओट्स पौष्टिक म्हणून खाता पण खरंच हेल्दी नाश्ता करताय की जंक ढकलताय पोटात?

instant oats healthy or unhealthy : is instant oatmeal good for health : is eating instant oats everyday healthy : इन्स्टंट ओट्स हा खरंच हेल्दी नाश्त्याचा योग्य पर्याय आहे की नाही, ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2026 17:44 IST2026-03-05T17:22:49+5:302026-03-05T17:44:10+5:30

instant oats healthy or unhealthy : is instant oatmeal good for health : is eating instant oats everyday healthy : इन्स्टंट ओट्स हा खरंच हेल्दी नाश्त्याचा योग्य पर्याय आहे की नाही, ते पाहा...

instant oats healthy or unhealthy is instant oatmeal good for health is eating instant oats everyday healthy | २ मिनिटांत तयार होणारे ओट्स पौष्टिक म्हणून खाता पण खरंच हेल्दी नाश्ता करताय की जंक ढकलताय पोटात?

२ मिनिटांत तयार होणारे ओट्स पौष्टिक म्हणून खाता पण खरंच हेल्दी नाश्ता करताय की जंक ढकलताय पोटात?

सकाळची घाई, ऑफिसची धावपळ आणि हातात असलेला कमी वेळ... अशा वेळी आपल्या मदतीला येतो तो म्हणजे '२ मिनिटांत तयार होणारा इन्स्टंट ओट्स'चा बाऊल. वजन कमी करायचे असो किंवा हेल्दी नाश्ता करायचा असो, आजकाल अनेकांची पहिली पसंती ओट्सला असते. नूडल्सप्रमाणेच हे अवघ्या दोन मिनिटांत तयार होतात आणि चवीलाही अतिशय चविष्ट लागतात. पण, आपण कधी विचार केला आहे का की, जे पदार्थ इतक्या लवकर शिजतात आणि ज्यांची चव वाढवण्यासाठी त्यात विविध फ्लेवर्स मिसळले जातात, ते खरोखरच आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत? ओट्स हे मुळात आरोग्यासाठी उत्तम मानले जातात, पण 'रोल्ड ओट्स' किंवा 'स्टील कट ओट्स'च्या तुलनेत 'इन्स्टंट ओट्स' प्रक्रियेच्या (Processing) अनेक टप्प्यातून गेलेले असतात. मग प्रश्न पडतो की, झटपट तयार होण्याच्या नादात त्यातील पोषक तत्वे टिकून राहतात का? की आपण हेल्दी नाश्त्याच्या नावाखाली फक्त साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज (Preservatives) खात आहोत? असे अनेक प्रश्न पडतात...(Instant oats healthy or unhealthy).

घाईगडबडीत खाल्ले ( is instant oatmeal good for health) जाणारे हे इन्स्टंट ओट्स खरोखरच आरोग्यासाठी तितकेसे फायदेशीर आहेत का? त्यामध्ये असलेले पोषक घटक, प्रक्रिया आणि त्यात कधी घातले जाणारे मीठ, साखर किंवा फ्लेवर्स यामुळे त्यांचे हेल्दी गुणधर्म कमी होऊ शकतात. त्यामुळे इन्स्टंट ओट्स हा खरंच हेल्दी नाश्त्याचा योग्य (is eating instant oats everyday healthy) पर्याय आहे की नाही ते माहित असणे गरजेचे असते... 

इन्स्टंट ओट्स खाल्ल्याने पोट लवकर भरते...

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन (National Library of Medicine) च्या एका अभ्यासामध्ये ४८ निरोगी प्रौढ व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासात प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा नाश्ता देण्यात आला. ज्या लोकांनी नाश्त्यात इन्स्टंट ओट्स खाल्ले, त्यांना त्यांचे पोट लवकर भरल्यासारखे वाटले आणि दीर्घकाळ भूक लागली नाही. या अभ्यासामध्ये इन्स्टंट ओट्स खाण्याचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत.

पोट साफ नाही, तासंतास वॉशरुममध्ये बसता? वाटीभर दही आणि गुळाचा हा उपाय एकदम असरदार...

तुम्ही तेल नाही पॉयझन खाताय, तुमचं तेल करतेय हृदयावर ‘विष प्रयोग!’पाहा कोणतं तेल जास्त चांगलं कोणतं घातक...

इन्स्टंट ओट्स जास्त प्रोसेस्ड असतात... 

 'द न्यूट्रीवाइज क्लिनिक'च्या आहारतज्ज्ञ नेहा सिन्हा यांनी सांगितले की, इन्स्टंट ओट्स देखील रोल्ड ओट्सप्रमाणेच हेल्दी असतात. इन्स्टंट ओट्स आणि रोल्ड ओट्सच्या कॅलरीजमध्ये फारसा फरक नसतो. ४० ग्रॅम इन्स्टंट ओट्समध्ये सुमारे २०० कॅलरीज असतात, तर रोल्ड ओट्समध्ये सुमारे १५० कॅलरीज असतात.

इन्स्टंट ओट्समध्ये फॅट आणि फायबरचे प्रमाण ३ ग्रॅम असते, तर रोल्ड ओट्समध्ये हेच प्रमाण ५ ते ६ ग्रॅम असते. इन्स्टंट ओट्स हे जास्त प्रोसेस्ड (प्रक्रिया केलेले) असतात, त्यामुळे ते खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. दुसरीकडे, रोल्ड ओट्सवर कमी प्रक्रिया केलेली असते; त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते, ते हळूहळू पचतात आणि ते खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते.

रोल्ड ओट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो... 

इन्स्टंट ओट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) सुमारे ८० असतो आणि ग्लायसेमिक लोड (GL) सुमारे १७ असतो. याउलट, रोल्ड ओट्सचा विचार केल्यास त्यांचा जीआय (GI) ५५ असतो आणि जीएल (GL) सुमारे ११ असतो. याचाच अर्थ, मधुमेही (Diabetic) रुग्णांसाठी रोल्ड ओट्स हा अधिक चांगला पर्याय आहे, कारण इन्स्टंट ओट्सच्या तुलनेत त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.

उठणं - बसणंही झालं होतं कठीण, पण श्वेता तिवारीने 'या' घरगुती उपायाने कमी केलं युरिक अ‍ॅसिड...

इन्स्टंट ओट्स की रोल्ड ओट्स ?

इन्स्टंट आणि रोल्ड ओट्स हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार यापैकी कोणत्याही प्रकारचे ओट्स खाऊ शकता. 'नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन'च्या (National Library of Medicine) अभ्यासानुसार, इन्स्टंट ओट्स खाल्ल्याने आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

दुसरीकडे, आहारतज्ज्ञ नेहा सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे की, इन्स्टंट ओट्स हे रोल्ड ओट्सच्या तुलनेत जास्त 'प्रोसेस्ड' असतात आणि त्यांचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' देखील जास्त असतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी रोल्ड ओट्स हा अधिक उत्तम पर्याय आहे. निरोगी व्यक्तींसाठीही रोल्ड ओट्स हा एक चांगला पर्याय ठरू शकतो; इन्स्टंट ओट्स खाल्ल्याने शरीरावर कोणताही वाईट परिणाम दिसून येत नाही. थोडक्यात सांगायचे तर, तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि सुविधेनुसार योग्य तो पर्याय निवडू शकता.

Web Title : इंस्टेंट ओट्स: सेहतमंद नाश्ता या सिर्फ कैलोरी?

Web Summary : इंस्टेंट ओट्स सुविधाजनक हैं, लेकिन अत्यधिक प्रोसेस्ड होने से ब्लड शुगर बढ़ता है। रोल्ड ओट्स, अधिक फाइबर और कम ग्लाइसेमिक इंडेक्स के साथ, स्वस्थ हैं, खासकर मधुमेह रोगियों के लिए। अपनी आवश्यकताओं के अनुसार बुद्धिमानी से चुनें।

Web Title : Instant Oats: Healthy Breakfast or Just Empty Calories?

Web Summary : Instant oats offer convenience, but are highly processed, raising blood sugar. Rolled oats, with more fiber and a lower glycemic index, are healthier, especially for diabetics. Choose wisely based on your needs.