भूक लागल्यानंतर पटकन काय बनवता येईल हा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी पर्यायी पदार्थ असतो तो इन्स्टंट मॅगीचा आणि नूडल्सचा. (Instant noodles health risks) अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना मॅगी खायला आवडते.अनेकांच्या अतिशय आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. (Hypertension and instant noodles) अगदी २ मिनिटांत होणारे नूडल्स आणि मॅगी हे अनेक जण चवीने खातात. मॅगीच्या ब्रॅण्डसोबत बाजारात अनेक नूडल्सचे प्रकार आले आहेत. (Noodles and high blood pressure risks) इन्स्टंट मॅगीनंतर मॅगी मसाल्याने अनेक गृहिणींचे काम सोपे केले. भाज्यांना किंवा इतर पदार्थांना चव आणण्यासाठी मॅगी मसाला हमखास वापरला जातो.(High sodium diet and hypertension) बाजारातही या मसाल्याचे अनेक छोटे पॅकेट उपलब्ध आहेत. परंतु, याचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने आपल्या आरोग्याला धोका होऊ शकतो. असं आहारातज्त्र अमिता गद्रे यांनी सांगितलं आहे. (Health risks of masala noodles)
'या' ४ चुकांमुळे पाठदुखी-कंबरेचा होतो त्रास, तासन्तास लॅपटॉपवर बसून करताय काम? बघा काय करायचे
आहारतज्ज्ञ अमिता गद्रे म्हणताय की, मॅगी मसाला खाऊ शकतो का? तर हो... मॅगी मसाला खाताना तो जपून खायवा हवा. ६ ग्रॅमच्या मॅगी मसाला पॅकेटमध्ये ६५५ ग्रॅम सोडियम असते. दिवसाला आपल्याला शरीराला २००० मिलीग्रॅम इतक्या सोडियमची आवश्यकता असते. याच्या एका पॅकेटमध्ये चार जणांसाठी जेवण बनवले तर चांगले परंतु, एकाच व्यक्तीसाठी एक पॅकेट वापरले तर शरीरातील सोडिमचे प्रमाण वाढते. तसेच या मसाल्याचा वापर केल्यानंतर जेवणात अधिक मिठाचा वापर करु नका.
जर सकाळी आपण भाजी किंवा भातात या मसाल्याचा वापर केला असेल तर संध्याकाळी अधिक हाय फ्लेमवर तयार केलेले चायनिस किंवा नुडल्स खाऊ नये. जर अधिक प्रमाणात मिठाचे सेवन केले तर हायपरटेन्शनचा धोका वाढतो. पण जर या चवीमुळे मुलांना भाज्या किंवा इतर पदार्थ आवडत असतील तर १० ते १५ दिवसानंतर किंवा महिन्यातून २ वेळाच या मसाल्याचा वापर करायला हवा. आपल्या शरीरात मिठाचे प्रमाण वाढले तर त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. जास्त मीठ खाल्ल्याने ॲसिडिटी, गॅस आणि मूळव्याध सारख्या समस्या उद्भवतात. मायग्रेनची समस्या, अचानक रक्तदाब वाढणे, लवकर झोप न येणे या आजारांचा धोकाही वाढतो. त्यामुळे आपण पुरेसे आणि योग्य प्रमाणात मीठाचे सेवन करायला हवे.