साधे वाटणारे दुखणे कधी गंभीर आजाराचे रुप घेऊ शकते याचा काही नेम नाही. असे अनेक आजार आहेत जे माणसाचा आत्मविश्वास कमी करतात आणि खचवून टाकतात. असाच एक आजार म्हणजे क्षयरोग (TB). या आजाराची कसे लढावे आणि काय करावे याचा धडा आपल्याला जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा लक्षात घेण्यासारखा आहे. दरवर्षी २४ मार्च हा दिवस 'जागतिक क्षयरोग दिन' म्हणून साजरा केला जातो. (Ignored back pain, turned out to be TB: Amitabh Bachchan’s advice—tuberculosis is curable if detected on time)या दिवसाचा उद्देश म्हणजे क्षयरोगाबद्दल जनजागृती करणे आणि लोकांना वेळेवर तपासणी व उपचार घेण्यास प्रवृत्त करणे.
याच संदर्भात जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सांगितलेला त्यांचा अनुभव अनेकांसाठी डोळे उघडणारा ठरेल. त्यांनी सांगितले की, त्यांना अनेक वर्षे पाठदुखीचा त्रास होत होता, पण तो साधा त्रास समजून दुर्लक्षित करत गेले. त्यांना वाटत होते की जास्त वेळ बसल्यामुळे किंवा कामाच्या ताणामुळे पाठ दुखत आहे. त्रास अगदीच वाढल्यावर मात्र नंतर तपासणी केली. ती केल्यानंतर समजले की, ही साधी वेदना नसून मणक्याचा क्षयरोग म्हणजेच स्पाइनल टीबी आहे.
अमिताभ बच्चन यांनी स्पष्टपणे सांगितले की, "आपण शरीर देत असलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो आणि तिच आपली सगळ्यात मोठी चूक ठरते." योग्य वेळी निदान झाले नसते तर हा माझा आजार अधिक गंभीर होऊ शकला असता. होत्याचे नव्हते व्हायला अजिबात वेळ लागला नसता. पण वेळेवर उपचार घेतल्यामुळे ते पूर्णपणे बरे झाले. त्यांच्या या अनुभवातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो, कोणताही त्रास सतत होत असेल तर तो किरकोळ समजून टाळू नये. शरीर देत असलेले संकेत ओळखायला शिकणे फार गरजेचे आहे.
क्षयरोग हा एक गंभीर आजार आहे, जो फक्त फुफ्फुसांपुरता मर्यादित नसून शरीराच्या इतर भागांनाही होऊ शकतो, जसे की मणका. त्यामुळे सतत वेदना, अशक्तपणा, वजन कमी होणे किंवा ताप यांसारखी लक्षणे दिसत असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या व्यस्त जीवनशैलीत आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, पण शरीर कधीच खोटं बोलत नाही. ते सतत काहीतरी सांगत असते, फक्त आपण ते ऐकण्याची गरज आहे. जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी, की वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार हेच मोठ्या आजारांपासून वाचण्याचे सर्वोत्तम साधन आहे.
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, शरीराच्या छोट्या छोट्या संकेतांकडे लक्ष द्या आणि गरज वाटल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. छोटी लक्षणे दुर्लक्षित केल्यास मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
Web Summary : Amitabh Bachchan ignored back pain, which turned out to be spinal TB. He stresses early detection is crucial. Don't ignore body's signals; timely checkups and treatment can prevent serious health issues. Health is wealth; act promptly.
Web Summary : अमिताभ बच्चन ने पीठ दर्द को अनदेखा किया, जो बाद में स्पाइनल टीबी निकला। उन्होंने शीघ्र पता लगाने पर जोर दिया। शरीर के संकेतों को अनदेखा न करें; समय पर जांच और उपचार से गंभीर स्वास्थ्य समस्याओं को रोका जा सकता है। स्वास्थ्य ही धन है; तुरंत कार्रवाई करें।