Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बाई गं टाच टेकवतच नाही!! टाच सारखी दुखत असेल तर तुम्हाला या ५ घरगुती उपायांची गरज आहे

बाई गं टाच टेकवतच नाही!! टाच सारखी दुखत असेल तर तुम्हाला या ५ घरगुती उपायांची गरज आहे

If your heel hurts, you need these 5 home remedies - easy to do and effective : टाचदुखी घरीच करा बरी. पाहा सोपे उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2026 10:12 IST2026-01-18T10:10:38+5:302026-01-18T10:12:15+5:30

If your heel hurts, you need these 5 home remedies - easy to do and effective : टाचदुखी घरीच करा बरी. पाहा सोपे उपाय.

If your heel hurts, you need these 5 home remedies - easy to do and effective | बाई गं टाच टेकवतच नाही!! टाच सारखी दुखत असेल तर तुम्हाला या ५ घरगुती उपायांची गरज आहे

बाई गं टाच टेकवतच नाही!! टाच सारखी दुखत असेल तर तुम्हाला या ५ घरगुती उपायांची गरज आहे

टाचदुखी हा आजकाल अनेकांना जाणवणारा त्रास आहे. सकाळी उठल्यावर पहिले पाऊल टाकताना होणारी तीव्र वेदना, चालताना पायात काहीतरी टोचत असल्याची जाणीव किंवा दिवसभर उभे राहिल्यानंतर टाच टेकवण्याचीही ताकद न उरणे यामुळे दैनंदिन कामेही अवघड होतात. वेळेवर काळजी घेतली नाही तर हा त्रास वाढत जातो. (If your heel hurts, you need these 5 home remedies - easy to do and effective )टाचदुखी का होते आणि त्यावर घरच्या घरी काय उपाय करता येतील हे जाणून घेतल्यास आराम मिळू शकतो.

टाचदुखी होण्यामागे अनेक कारणे असतात. जास्त वेळ उभे राहणे किंवा कठीण जमिनीवर चालणे हे त्यातील प्रमुख कारण आहे. चुकीची किंवा फार कडक चप्पल-बूट वापरल्यास टाचेवर जास्त ताण येतो. वजन वाढलेले असल्यास शरीराचा भार थेट टाचांवर पडतो आणि वेदना वाढतात. काही वेळा पायाच्या स्नायूंमध्ये ताण येणे, प्लांटर फॅसिआयटिससारखी समस्या, कॅल्शियमची कमतरता किंवा वयानुसार हाडे आणि सांधे कमकुवत होणे यामुळेही टाचदुखी उद्भवते. मधुमेह, संधिवात यांसारख्या आजारांमुळेही टाचेत वेदना जाणवू शकतात.

टाचदुखीवर घरगुती उपाय अतिशय प्रभावी ठरू शकतात. कोमट पाण्यात मीठ किंवा खडेमीठ घालून पाय बुडवणे हा सर्वात सोपा आणि उपयुक्त उपाय आहे. यामुळे टाचेतील सूज कमी होते आणि स्नायूंना आराम मिळतो. पाय बुडवणे टाचांना मोहरीचे तेल, तिळाचे तेल किंवा खोबरेल तेलाने हळूवार मालीश केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि वेदना कमी होतात.

बर्फाचा शेक हा ही टाचदुखीसाठी उपयोगी ठरतो. टाच दुखत असल्यास दिवसातून एक-दोन वेळा १० ते १५ मिनिटे बर्फ कपड्यात गुंडाळून टाचेला लावावा. यामुळे सूज आणि वेदना कमी होते. घरात उपलब्ध असल्यास 
कोरफड टाचेला लावल्यानेही थंडावा मिळतो आणि त्वचा मऊ राहते.

टाचदुखी कमी करण्यासाठी पायांचे हलके व्यायाम आणि स्ट्रेचिंग खूप महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यावर पायांना गोल फिरवणे, टॉवेल पायाने ओढण्याचा व्यायाम किंवा भिंतीला टेकून पायाचे स्नायू ताणणे यामुळे टाचांवरील ताण कमी होतो. नियमित व्यायामामुळे वेदना हळूहळू कमी होतात.

आहाराकडे लक्ष देणेही तितकेच गरजेचे आहे. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशियम यांची कमतरता असल्यास टाचदुखी वाढू शकते. दूध, दही, तीळ, रागी, हिरव्या पालेभाज्या आणि सूर्यप्रकाश यांचा योग्य समावेश केल्यास हाडे मजबूत राहतात. वजन नियंत्रित ठेवले तर टाचांवरचा ताण आपोआप कमी होतो.

योग्य चप्पल किंवा बूट वापरणे हा टाचदुखीपासून वाचण्याचा महत्त्वाचा उपाय आहे. फार सपाट किंवा फार उंच टाचांची चप्पल टाळावी. सॉफ्ट सोल असलेली, टाचेला योग्य आधार देणारी पादत्राणे वापरल्यास चालताना आराम मिळतो.

Web Title : एड़ी दर्द से राहत: 5 प्रभावी घरेलू उपचार जो आपको अभी चाहिए।

Web Summary : एड़ी का दर्द खड़े रहने, गलत जूते या वजन के कारण आम है। घरेलू उपचार में गर्म नमक पानी से सिकाई, तेल मालिश, बर्फ की सिकाई और एलोवेरा लगाना शामिल है। स्ट्रेचिंग व्यायाम, कैल्शियम से भरपूर संतुलित आहार और सहायक जूते राहत के लिए महत्वपूर्ण हैं।

Web Title : Heel pain relief: 5 effective home remedies you need now.

Web Summary : Heel pain is common due to standing, improper footwear, or weight. Home remedies include warm salt water soaks, oil massages, ice packs, and aloe vera application. Stretching exercises, a balanced diet rich in calcium and supportive footwear are crucial for relief.