एकाच अभिनेत्रीचे डोळे वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगळे दिसतात. ते कसे दिसतात याचे कारण तर आपल्याला माहितीच आहे. अगदी रीतसर लेन्सचा वापर अभिनेत्री करतात. (If you wear contact lenses every day because you think you look stupid wearing glasses, then read this before you wear contact lenses.)मात्र सामान्य माणसांसाठी हा प्रकार काही रोजचा नाही. लग्नासाठी नवरी अशा लेन्स वापरते. आजकाल जवळपास सगळ्याच मेकअप आर्टीस्ट लेन्स लावायला लावतात. त्या नेहमी चांगल्या दिसतातच असे नाही. किंवा अगदी सुंदरही दिसतात मात्र लग्नसमारंभासाठी आता लेन्स हा प्रकार इतर मेकअप प्रमाणेच सामान्य झाला आहे.
दुसरा प्रकार म्हणजे नंबरच्या लेन्स असतात. चष्मा न लावता लेन्स लावायच्या. चष्मा चांगला दिसत नाही म्हणून लेन्स लावल्या जातात. शक्यतो हेच कारण असते. मात्र अजून तरी भारतात, चष्मा लावणे जेवढे कॉमन आहे तेवढे लेन्स लावणे कॉमन नाही. (If you wear contact lenses every day because you think you look stupid wearing glasses, then read this before you wear contact lenses.)लेन्स माहाग असतात हा एक भाग झाला आणि दुसरा भाग म्हणजे लेन्स लावायची अनेकांना भीती वाटते. आणि ती भीती सहाजिकच आहे. डोळ्याच्या आत काहीतरी लावणे हा विचार करतानाही भीती वाटेल. लेन्स डोळ्यात आडकल्या तर काय होईल असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. फार प्रसिद्ध डोळ्यांचे डॉक्टर राहिल चौधरी कायम सांगतात की, डोळ्यांसाठी लेन्स वापरणे अजिबात चांगले नाही. कितीही चांगले दिसो लेन्स लावणे टाळायलाच हवे.
लेन्सची काळजी फार घ्यावी लागते. थोडी जरी गडबड झाली तरी त्यामुळे डोळ्यांना दुखापत होऊ शकते. त्यामुळे चष्माच वापरावा. लेन्स हा चांगला उपाय नाही. तरी लावायचेच असतील तर डॉक्टरांकडून पद्धत नीट जाणून घ्या आणि मगच लावा असे डॉक्टर राहिल यांनी सांगितले. त्यांने विविध पॉडकास्ट्समध्ये कायम या विषयी माहिती दिली आहे. डोळ्याची बाहुली अगदीच नाजूक असते. त्यावर प्रयोग करणे चांगले नाही.
लग्नात सुंदर दिसण्यासाठी मेकअप आर्टीस्ट जे लेन्स लावते. ते लावणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी नक्कीच चांगले नाहीत. अनेकदा 'ताई लावा ओ छान दिसाल' असे सांगून त्या तुम्हाला भुरळ पाडतात. मात्र डोळे हा अवयव जसा आहे तसाच सुंदर दिसतो. त्याला सुशोभित करायची गरज नाही. डोळ्यांचा रंग बदलण्याची गरज नाही. त्यामुळे अशा लेन्स लावणे टाळायला हवे. जर नंबरच्या लेन्स लावण्याचा त्रास होऊ शकतो, तर मग आपल्याला माहिती नसलेल्या लेन्स डोळ्यात घातल्याने नक्कीच दुष्परिणाम होऊ शकतात.