बाहेरचं खाणं एकदम बंदच केलं. रोज तासभर व्यायामही करते. आहार चांगला पौष्टिक आहे. साखर तर पाहतही नाही आणि आता तेलकट पदार्थ खाणेही सोडले आहे. सगळे केले तरी वजन काही कमी होत नाही. उलट इतर त्रास वाढले आणि चिडचिड वाढायला लागली. तुमचेही असेच होत आहे का? वजन कमी करायचे म्हणजे उपासमार आणि धावपळ एवढेच आहे असे अनेकांना वाटते. मात्र तज्ज्ञ सांगतात, सगळ्याच गोष्टी व्यवस्थित असतील तरच शरीर साथ देते. (If you sleep after 11 pm, you won't lose weight! one mistake can effect metabolism )सगळे नियम पाळूनही जर वजन जैसे थे आहे, तर मग तुमची स्लिप सायकल सुधारायची गरज आहे. आजकाल रात्री ११वाजेपर्यंत जागणे म्हणजे फार काही मोठी गोष्ट नाही. सामान्यच आहे. अगदी १ वाजेपर्यंत जागणेही योग्यच वाटते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? डॉ. अमित सराफ (डायरेक्टर इंटर्नल मेडिसिन, ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे) सांगतात, उशीरा झोपण्याचा शरीरावर तर वाईट परिणाम होतोच शिवाय वजनही झपाट्याने वाढते.
आपल्या शरीराच्या काही वेळा ठरलेल्या असतात. त्यांचे जर आपण पालन केले नाही तर शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो. जागरण करण्याची सवय असेल तर शरीर कायम तणावात राहते. पचनाची क्रिया मंदावते. कार्टीसॉलवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे सगळ्याच प्रक्रियांवर परिणाम होतो. कितीही व्यायाम करा आणि डाएट करा तरी वजन कमी होतच नाही. त्यासाठी वेळेवर झोपणेही तेवढेच महत्त्वाचे असते. शरीरातील मेटाबॉलिझम रात्री ११ ते ३ च्या दरम्यान व्यवस्थित कार्यरत असतो. त्यावेळेत जर शरीर जागे असेल तर मेटाबॉलिझमवर त्याचा गंभीर परिणाम होतो. चांगले पौष्टिक खाल्ले असले तरी ते पचवणे जड जाते. त्यामुळे रात्री जागरणं करणाऱ्यांचे वजन कमी होत नाही.
जागरणामुळे शरीरातील लेपटीन आणि ग्रेलिन सारखी भूक आणि पचनाचे कार्य करणारी हार्मोन्स कार्य करु शकत नाहीत. त्यांच्यात असंतुलन वाढते. त्यामुळे अवेळी भूक लागते. फॅट्स बर्न होत नाहीत तर साठायला सुरवात होते. डॉक्टर सराफ म्हणतात, " रात्री ११ च्याआधी झोपण्याची सवय लावून घ्या. त्याचा चांगलाच फायदा होईल. झोपण्याच्या ३ तास आधी जेवण करा. चांगला आहार घ्या, पोटभर जेवा. रात्रीचे जेवण संध्याकाळी ८ च्या आधीच करा. ११ च्या आधी झोपायला सुरवात केल्यावर वजन कमी होईल. व्यायामाचा आणि डाएटचा फायदा होईल. झोपेचे चक्र सुधारल्याशिवाय फॅट बर्निंगची प्रक्रिया होत नाही. त्यामुळे हे नियम फायद्याचेच नाही तर गरजेचे आहेत.
Web Summary : Sleeping late disrupts metabolism, hindering weight loss despite diet and exercise. Prioritize sleep before 11 PM for effective fat burning and overall health. Adjusting sleep cycles is crucial for weight management.
Web Summary : देर से सोने से मेटाबॉलिज्म बिगड़ता है, जिससे डाइटिंग और एक्सरसाइज के बावजूद वजन कम नहीं होता। वजन घटाने और बेहतर स्वास्थ्य के लिए रात 11 बजे से पहले सोएं। नींद चक्र को ठीक करना ज़रूरी है।