उन्हाळा सुरू झाला की अनेकांना डोकेदुखीचा त्रास वाढतो. प्रखर उन्हात बाहेर जाणे, शरीरातील पाण्याची कमतरता, उष्णतेमुळे वाढलेला थकवा आणि डिहायड्रेशन यामुळे डोकेदुखी होऊ शकते. काही वेळा ही वेदना हलकी असते, तर कधी ती तीव्र होऊन काम करणेही कठीण जाते. (If you have a headache due to the sun heat, try these 5 home remedies, an easier solution)त्यामुळे उन्हामुळे होणाऱ्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष न करता वेळेवर उपाय करणे गरजेचे आहे.
उष्णतेमुळे होणाऱ्या डोकेदुखीवर सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे पाणी पित राहणे. दिवसभरात भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. फक्त पाणीच नव्हे तर ताक, लिंबूपाणी, नारळपाणी यांसारखी पेये घेतल्यास शरीर थंड राहते आणि डोकेदुखी कमी होते. शरीरात पाण्याची कमतरता झाली की मेंदूवर ताण येतो आणि डोके दुखायला लागते, त्यामुळे हायड्रेशन हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
डोकेदुखी कमी करण्यासाठी थंड पाण्याची पट्टी कपाळावर ठेवणेही खूप उपयोगी ठरते. थंड पाण्यात कापड भिजवून ते कपाळावर किंवा मानेवर ठेवले की शरीराचे तापमान कमी होतो आणि आराम मिळतो. काही लोकांना गुलाबपाणी किंवा चंदन लावल्यानेही थंडावा मिळतो आणि वेदना कमी होतात.
घरगुती उपायांमध्ये डोक्याला हलक्या हाताने तेलाने मसाज करणेही फायदेशीर आहे. नारळाचे तेल किंवा तिळाचे तेल वापरुन डोक्याला मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. विशेषतः गरम वातावरणात थोडा वेळ शांत, थंड जागेत बसून डोळे बंद करून विश्रांती घेतल्यासही आराम मिळतो.
आहाराचाही डोकेदुखीवर परिणाम होतो. खूप तिखट, तेलकट किंवा जड अन्न खाल्ल्यास उष्णता वाढते आणि डोकेदुखी तीव्र होऊ शकते. त्यामुळे हलका, पचायला सोपा आणि थंडावा देणारा आहार घ्यावा. काकडी, कलिंगड यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खाणे फायदेशीर ठरते.
उन्हात बाहेर पडताना डोक्याचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. टोपी, स्कार्फ किंवा छत्री वापरल्यास थेट सूर्यकिरणांपासून बचाव होतो आणि डोकेदुखी होण्याची शक्यता कमी होते. तसेच शक्यतो दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे.
Web Summary : Combat summer headaches with hydration, cold compresses, and gentle head massages. Avoid spicy foods, opt for cooling fruits like watermelon, and protect yourself from the sun with hats and scarves. Staying indoors during peak heat hours can also prevent headaches.
Web Summary : गर्मी के सिरदर्द से राहत पाने के लिए खूब पानी पिएं, ठंडी पट्टी लगाएं और सिर की मालिश करें। मसालेदार भोजन से बचें, तरबूज जैसे फल खाएं, और धूप से बचने के लिए टोपी व स्कार्फ पहनें। दोपहर में घर के अंदर रहें।