Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हार्ट अटॅक येण्याआधीच ओळखा धोका, घरीच 'या' गोष्टी तपासा, सांभाळा हृदयाचं आरोग्य!

हार्ट अटॅक येण्याआधीच ओळखा धोका, घरीच 'या' गोष्टी तपासा, सांभाळा हृदयाचं आरोग्य!

Heart Health: काही हृदयरोगाची माहिती तुम्ही घरीच घेऊ शकता. यासाठी बीपी, हार्ट रेट मॉनिटरींग, पायऱ्या चढणे अशा गोष्टी करू शकता किंवा बोटांच्या माध्यमातून ब्लॉकेजची माहिती मिळवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:36 IST2025-01-22T11:18:55+5:302025-01-22T13:36:38+5:30

Heart Health: काही हृदयरोगाची माहिती तुम्ही घरीच घेऊ शकता. यासाठी बीपी, हार्ट रेट मॉनिटरींग, पायऱ्या चढणे अशा गोष्टी करू शकता किंवा बोटांच्या माध्यमातून ब्लॉकेजची माहिती मिळवू शकता.

Identify heart blockage at home with these easy methods | हार्ट अटॅक येण्याआधीच ओळखा धोका, घरीच 'या' गोष्टी तपासा, सांभाळा हृदयाचं आरोग्य!

हार्ट अटॅक येण्याआधीच ओळखा धोका, घरीच 'या' गोष्टी तपासा, सांभाळा हृदयाचं आरोग्य!

Heart Health: भारतात हृदयरोगांचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हृदयरोगाच्या मुख्य कारणांमध्ये डायबिटीस, हायपरटेंशन इत्यादींचा समावेश आहे. अशा स्थितीत प्रत्येक व्यक्तीला हृदयरोगाबाबत जागरूक असायला हवं. काही हृदयरोगाची माहिती तुम्ही घरीच घेऊ शकता. यासाठी बीपी, हार्ट रेट मॉनिटरींग, पायऱ्या चढणे अशा गोष्टी करू शकता किंवा बोटांच्या माध्यमातून ब्लॉकेजची माहिती मिळवू शकता.

घरीच पटवा हार्ट ब्लॉकेज ओळख

हार्ट ब्लॉकेज आज एक मोठी समस्या बनली आहे. जेव्हा हार्टच्या धमण्यांमध्ये प्लाक जमा होतो, तेव्हा ब्लड सर्कुलेशन सुरळीत होत नाही. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. हार्ट ब्लॉकेज झाल्यावर काही लक्षणं अशीही असतात जी तुम्ही घरीच जाणून घेऊ शकता. हार्ट ब्लॉकेजची माहिती मिळवण्यासाठी आज आम्ही काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.

हार्ट ब्लॉकेजची सुरूवातीची लक्षणं

स्मोकिंग, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉल, डायबिटीस, लठ्ठपणा यांसारख्या स्थिती हार्ट ब्लॉकेजचा धोका अधिक वाढवतात. तेच हार्ट ब्लॉकेजच्या सुरूवातीच्या लक्षणांमध्ये छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास, थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, कमजोरी आणि थंडी लागणे इत्यादींचा समावेश आहे. या लक्षणांवर लक्ष देऊन तुम्ही हार्ट ब्लॉकेजची ओळख पटवू शकता.

ब्लड प्रेशर मॉनिटर करा

हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी वेळोवेळी ब्लड प्रेशर मॉनिटर केलं पाहिजे. एका व्यक्तीचा नॉर्मल बीपी 120/80 असायला हवा. पण वय, वजन, लिंग औषधांमुळे हा कमी जास्त होऊ शकतो.

हार्ट रेट ट्रॅक करा

नॉर्मल हार्ट रेट एका मिनिटात 60 ते 100 असतं. जर यात बदल होत असेल तर याचा हार्ट हेल्थवर वाईट प्रभाव पडू शकतो. त्यामुळे गरजेचं आहे की, आपलं हार्ट रेट मॉनिटर करत रहा. आपल्या मनगटावर दोन बोटं ठेवूनही हार्ट रेट चेक करू शकता.

पायऱ्यांची टेस्ट

हार्ट ब्लॉकेज चेक करण्यासाची एक पद्धत म्हणजे पायऱ्यांची टेस्ट. रिसर्चनुसार, जर एक व्यक्ती ९० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळात ६० पायऱ्या चढत असेल तर हार्ट हेल्थ चांगली आहे. जर असं होत नसेल तर हार्ट ब्लॉकेजचा धोका असू शकतो.

बोटांनी ब्लॉकेज चेक करा

आजकाल ही पद्धत सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यासाठी रिंग फिंगर आणि लिटिल फिंगरला दुसऱ्या बोटांनी दाबा आणि मिडल फिंगरनं तळहाताला स्पर्श करा. जर यादरम्यान तुमच्या मनगटात वेदना होत असेल तर हार्ट ब्लॉकेजचा धोका असू शकतो.

Web Title: Identify heart blockage at home with these easy methods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.