Join us

बीपी- शुगरचा त्रास असेल तर सगळ्यात आधी 'हा' पांढरा पदार्थ बंद करा- मिठापेक्षाही आहे वाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2024 16:48 IST

Health Tips For Hypertension And Diabetes Patient: रक्तदाब, मधुमेह असा त्रास असेल तर सगळ्यात आधी एक पांढरा पदार्थ खाणं पुर्णपणे बंद केलं पाहिजे...

ठळक मुद्दे तुम्ही खाता तेव्हा तुमच्या रोजच्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त पटीने सोडियम तुमच्या पोटात जातं. ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.

हल्ली रक्तदाब, मधुमेह हा त्रास अनेक जणांमध्ये दिसून येत आहे. पुर्वी वयाचा एक विशिष्ट टप्पा ओलांडला की हा आजार मनुष्याला गाठायचा. पण आता मात्र वयाचा आणि या आजारांचा काहीही संबंध उरलेला नाही. अगदी तिशीतही रक्तदाब, हायपरटेन्शन, शुगर असा त्रास अनेकांना असतो. आता ज्यांना बीपी किंवा ब्लड प्रेशरचा त्रास असेल असे लोक मीठ खाण्याचे प्रमाण कमी करतात. पण त्याचबरोबर जाे पदार्थ त्यांच्या आरोग्यासाठी मिठापेक्षाही जास्त धोकादायक ठरू शकतो, असा पांढरा पदार्थ मात्र नेहमी खातात. मीठापेक्षाही जास्त घातक असणारा तो पदार्थ नेमका कोणता ते पाहा...(hypertension, diabetes patient must avoid bread)

 

बीपी, मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी 'हा' पदार्थ खाणे टाळा

हायपरटेंशन, शुगर हा त्रास ज्या व्यक्तींना आहे, त्या व्यक्तींनी कोणता पदार्थ खाणं कटाक्षाने टाळलं पाहिजे याविषयीचा एक व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी Nutritionist Amita Gadre या सोशलमिडिया हॅण्डलवर शेअर केला आहे.

घरात दररोज धूप- उदबत्ती लावणं जीवावर बेतू शकतं? बघा याविषयीचं संशोधन काय सांगतं....

यामध्ये त्यांनी जो पदार्थ सांगितला आहे तो पदार्थ म्हणजे ब्रेड. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो साधा व्हाईट ब्रेड असो किंवा मग ब्राऊन किंवा मल्टीग्रेन ब्रेड असो. कोणत्याही प्रकारचा ब्रेड जरी तुम्ही खात असाल तरी त्यात सोडीयमचे प्रमाण खूप जास्त असते. जवळपास १६ ते १७ टक्के सोडियम एका ब्रेडच्या स्लाईसमधून पोटात जाते. यावर पुन्हा आपण चीज, बटर असे मीठयुक्त पदार्थ लावतो. अनेक जण तर त्यावर चाट मसालाही टाकतात. 

 

असं सगळं टाकून जेव्हा तुम्ही तो ब्रेड खाता तेव्हा तुमच्या रोजच्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त पटीने सोडियम तुमच्या पोटात जातं. ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.

मुलांसाठी वह्या आणि स्टेशनरी घ्या होलसेल दरात, बघा पैशांची बचत करणारे ३ पर्याय

जर रक्तदाब, मधुमेह आहे म्हणून तुम्ही मीठ खात नसाल किंवा कमी खात असाल पण त्याउलट मात्र ब्रेड किंव ब्रेडचे विविध पदार्थ मात्र आवडीने खात असाल तर ते तुमच्या शरीरासाठी चांगले नाही. त्यामुळे शरीरातली सोडियमची पातळी वाढते आणि त्यामुळे मधुमेह, बीपी किंवा हायपरटेन्शन अशा आजारांची तिव्रता वाढू शकते. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेहअन्न