Join us   

कितीही स्वच्छ घासले तरी दात पिवळे दिसतात? पांढऱ्या दातांसाठी 'या' टिप्स वापरा कायमचा दूर होईल पिवळेपणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 1:05 PM

How to whiten yellow teeth : चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर जर तुम्ही व्यवस्थित ब्रश केले आणि कोमट पाण्याने धुतले तर दात पिवळे पडण्याची समस्या तुम्हाला त्रास देणार नाही.

आपले दात स्वच्छ, पांढरेशुभ्र दिसावेत असं प्रत्येकालाच वाटतं. जर  दात पिवळे दिसत असतील चारचौघात बोलताना, हसताना अवघडल्यासारखं होतं. आत्मविश्वास कमी होतो.  खाण्यापिण्याच्या सवयींमुळे नकळतपणे दातांवर  थर जमा होत जातात. जास्त चहा-कॉफी पिण्याची सवय आणि तोंडाच्या स्वच्छतेची काळजी न घेतल्याने दात पिवळे पडण्याची समस्या तुम्हाला सतावू शकते. यामुळे दातांचे नुकसान होऊ शकते. तुम्हालाही दातांची ही समस्या असेल तर काही सोप्या टिप्स फॉलो करा. याचा फायदा तुमच्या दातांना होईल. (How to whiten yellow teeth)

कोमट पाणी

चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर जर तुम्ही व्यवस्थित ब्रश केले आणि कोमट पाण्याने धुतले तर दात पिवळे पडण्याची समस्या तुम्हाला त्रास देणार नाही. काहीही  खाल्ल्यानंतर किंवा चहा-कॉफी प्यायल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. याचा फायदा होईल.

इम्यूनिटीसाठी काढा पिणारे सर्वाधिक लोक करतात या ५ चुका; संसर्ग टाळण्यासाठी वेळीच जाणून घ्या 

संत्री

संत्री खाल्ल्याने दात पिवळे पडण्याची समस्याही दूर होईल. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी असते. जे दात पांढरे होण्यास मदत करतात. हे दातांमधून बॅक्टेरिया काढून टाकते. ज्यामुळे प्लेकची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. रोज संत्र्याची साल दातांवर चोळल्यानेही फायदा होईल. रोज रात्री संत्र्याची साल दातांवर चोळा. त्यानंतर ब्रश करा.

चेहरा गोरा अन् मान काळपटपण पडलीये? मानेवरचं टॅनिंग झटपट घालवण्यासाठी हे घ्या सोपे घरगुती उपाय 

सफरचंद

सफरचंद दातांचा पिवळेपणा दूर करण्यास मदत करेल. यामुळे तुमचे दात पांढरे आणि चमकदार होतील. सफरचंदांमध्ये मॅलिक अॅसिड असते, जे एक नैसर्गिक पांढरे करणारे एजंट आहे. रोज एक सफरचंद खा. हे दात स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि डागांसह बॅक्टेरिया देखील दूर करेल.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यब्यूटी टिप्स