Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जांभळांच्या बियांची पावडर रोज खाणे म्हणजे वरदान, पण कुणी खावी आणि कुणासाठी अयोग्य...

जांभळांच्या बियांची पावडर रोज खाणे म्हणजे वरदान, पण कुणी खावी आणि कुणासाठी अयोग्य...

How To Use Jamun Seeds Powder To Treat Diabetes & Other Lifestyle Diseases : Benefits Of Jamun Seed Powder For Health : Consume jamun seed powder every day to manage diabetes and blood pressure; know all benefits :आरोग्य सुधारण्यासाठी दररोज एक चमचा जांभूळ बियांची पावडर खाण्याचे फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2025 13:37 IST2025-05-20T13:36:33+5:302025-05-20T13:37:19+5:30

How To Use Jamun Seeds Powder To Treat Diabetes & Other Lifestyle Diseases : Benefits Of Jamun Seed Powder For Health : Consume jamun seed powder every day to manage diabetes and blood pressure; know all benefits :आरोग्य सुधारण्यासाठी दररोज एक चमचा जांभूळ बियांची पावडर खाण्याचे फायदे...

How To Use Jamun Seeds Powder To Treat Diabetes & Other Lifestyle Diseases Benefits Of Jamun Seed Powder For Health | जांभळांच्या बियांची पावडर रोज खाणे म्हणजे वरदान, पण कुणी खावी आणि कुणासाठी अयोग्य...

जांभळांच्या बियांची पावडर रोज खाणे म्हणजे वरदान, पण कुणी खावी आणि कुणासाठी अयोग्य...

उन्हाळ्यात आपण आंबे, फणसासोबतच गर्द जांभळ्या रंगाचे जांभूळ देखील खातो. घरोघरी हमखास जांभळं मोठ्या आवडीने खाल्ली जातात. जांभूळ खाल्ल्यानंतर आपण शक्यतो त्याच्या बिया (How To Use Jamun Seeds Powder To Treat Diabetes & Other Lifestyle Diseases) फेकून देतो. परंतु या जांभूळाच्या बिया (Benefits Of Jamun Seed Powder For Health) आयुर्वेदात एक अत्यंत उपयुक्त आणि औषधी गुणधर्म असलेली आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असलेली बी मानले जाते. जांभूळाच्या फळाइतक्याच त्याच्या बियांनाही आरोग्यदायी महत्त्व आहे. विशेषतः जांभूळाच्या बियांची पावडर ही अनेक आजारांवर घरगुती उपाय म्हणून वापरली जाते. मधुमेह अपचन, लठ्ठपणा, त्वचेचे विकार इत्यादींसाठी ही पावडर उपयुक्त ठरते(Consume jamun seed powder every day to manage diabetes and blood pressure; know all benefits).

जांभूळाच्या बियांच्या पावडरमध्ये, नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स आणि विविध पोषणतत्त्वे असल्यामुळे शरीराला संपूर्ण पोषण मिळते. पारंपरिक आयुर्वेदामध्ये जांभूळाच्या बियांचा उपयोग विविध आजारांवर केला जात असे. जांभूळ हे आपल्या शरीरासाठी अत्यंत पोषणमूल्यांनी भरलेले फळ आहे, परंतु अनेकांना हे माहिती नाही की, जांभूळाच्या बियांमध्येही अनेक औषधी गुणधर्म असतात.जांभूळाच्या बियांची पावडर आरोग्यासाठी नेमकी कशी फायदेशीर ठरते, ती कोणत्या प्रकारे आणि किती प्रमाणात खावी, तसेच ही जांभळांच्या बियांची पावडर खाताना कोणत्या प्रकारची काळजी बाळगणं आवश्यक आहे, जेणेकरून तिचा अधिकाधिक फायदा होऊ शकेल या सर्व प्रश्नांवर नोएडा येथील 'कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक'चे संचालक कपिल त्यागी यांनी नवभारत टाइम्सला मुलाखत देताना अधिक माहिती सांगितली आहे. 

जांभळाच्या बियांची पावडर आहे आरोग्यासाठी खास... 

१. मधुमेह नियंत्रित करण्यास फायदेशीर :- जांभळाच्या बियांची पावडर शरीरातील इन्सुलिनची प्रक्रिया सुधारते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत मिळते. यासाठीच, मधुमेह किंवा प्रीडायबिटीज असलेल्या लोकांसाठी जांभळाच्या बियांची पावडर खाणे फायदेशीर ठरते. 

रात्री वारंवार लघवीला उठावे लागते, झोपमोड होते ? डॉक्टर सांगतात ४ उपाय, झोप लागेल शांत...

२. पचन सुधारण्यास उपयुक्त :- जांभळाच्या बियांमध्ये नैसर्गिक तुरट गुणधर्म असतात. हे अपचन, आम्लपित्त आणि पोट फुगणे यांसारख्या समस्यांपासून  आराम देतात. जांभूळ बियांची पावडर दररोज खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.

३. हृदय निरोगी ठेवण्यासाठी :- जांभळाच्या बियांच्या पावडरमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. हे गुणधर्म रक्तदाब कमी करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. जांभळाच्या बियांच्या पावडरमध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत मिळते. 

बारीक होणं महत्वाचं नाही, आरोग्य जपणं-फिट असणं महत्वाचं! साेनाली कुलकर्णी सांगते, ट्रेंडच्या नादी लागून...

४. किडनीचे आरोग्य जपण्यासाठी :- जांभळाच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, हे किडनी स्वच्छ करण्यास आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. यामुळे किडनीचे कार्य सुधारते. जांभळाच्या बियांची पावडर रक्त स्वच्छ करते आणि जळजळ कमी करते, यामुळे त्वचेवरील मुरुमे कमी होतात, काळे डाग हलके होतात तसेच त्वचेला नैसर्गिक चमक येते. 

५. वजन कमी करण्यास मदत करते :- रिकाम्या पोटी जांभळाच्या बियांची पावडर खाल्ल्याने चयापचय क्रिया वेगवान होते, यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. याचबरोबर, आपल्या शरीरातील फॅट्स बर्न करण्यासाठी आणि पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत होते. जांभळाच्या बियांच्या पावडरमध्ये भरपूर फायबर असते आणि त्यात कॅलरीज कमी असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी जांभळाच्या बिया फायदेशीर आहेत. यामुळे वारंवार खाण्याची  इच्छा कमी होते आणि जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते. हे वजन कमी करण्यास मदत करते.

६. जांभळाच्या बियांची पावडर कशी खावी ?

नोएडा येथील 'कपिल त्यागी' आयुर्वेद क्लिनिकचे संचालक 'कपिल त्यागी' यांनी सांगितल्याप्रमाणे, एक चमचा जांभळाच्या बियांची पावडर कोमट पाण्यात मिसळून हे पाणी दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. यानंतर २० ते ३० मिनिटे काहीही खाऊ नये. यामुळे तुम्हाला याचे चांगले परिणाम काही दिवसातच दिसू लागतील.

Web Title: How To Use Jamun Seeds Powder To Treat Diabetes & Other Lifestyle Diseases Benefits Of Jamun Seed Powder For Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.