Join us   

दातांवर पिवळा थर आलाय? ५ रूपयांची 'ही' वस्तू ब्रश करताना लावा; मोत्यासारखे पांढरे होतील दात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 4:27 PM

How To Use Eno For Yellow Teeth : दातांचा पिवळे दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला ५ ते १० रूपये खर्च करावे लागतील.

पिवळे दात झाल्यानंतर फक्त ओरल हेल्थवर परिणाम होत नाही तर कॉन्फिडेंसही कमी होतो. (Oral Health Tips)  खराब लाईफस्टाईल आणि चुकीच्या फुड हॅबिट्समुळे दातांवर पिवळेपणा येतो आणि मोकळेपणाने हसता येत नाही.  टिथ व्हाईटनिंगसाठी तुम्ही घरगुती ट्रिटमेंट्स घेऊ शकता. (How To Remove Yellow Stains from Teeth Naturally) काही घरगुती उपाय करून तुम्ही दातांवरचा पिवळा थर काढू शकता. दातांचा पिवळे  दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.  यासाठी तुम्हाला ५ ते १० रूपये खर्च करावे लागतील. (How To Get Rid Yellow Teeth)

पिवळे दात मोत्यांसारखे चमकवण्यासाठी तुम्ही 5 ते १० रूपयांच्या इनोचा वापर करू शकता. यासाठी फार काही करावं लागणार नाही. फक्त इनोचं एक पॅकेट घ्यावे लागेल. एका  वाटीत १ छोटा चमचा नारळाचे तेल घ्या त्यात ही पेस्ट घाला. ही पेस्ट दातांना ३ ते ५ मिनिटं ब्रशला लावून घ्या. आठवड्यातून ३ ते ४ वेळा लावल्यास दातांचा पिवळेपणा दूर होईल.

१) बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस

2017 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार बेकिंग सोड्याचा वापर दातांवर केल्यास डाग निघून जाण्यास मदत होते. (Ref) बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस वापरल्याने दातांचा पिवळेपणा दूर करण्यास मदत होते. एक चमचा बेकींग सोडा आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट टुथब्रशच्या मदतीने दातांना लावा. २ ते ३ मिनिटांनी गुळण्या करा. आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास पिवळेपणापासून सुटका मिळेल. 

२) मोहोरीचे तेल आणि हळद

एक चमचा मोहोरीच्या तेलात अर्धा चमचा हळद पावडर मिसळून बोटांच्या साहाय्याने किंवा ब्रशने दातांवर घासा. काही दिवसांनी फरक  दिसून येईल. हळदीऐवजी ऐवजी तुम्ही  मीठाचा वापरही करू शकता. आठवड्यातून २ वेळा हा उपाय करू शकता. 

३) एपल सायडर व्हिनेगर

एप्पल सायडर व्हिनेगर  दातांचा पिवळेपणा दूर करण्याासठी फायदेशीर ठरतो. यासाठी एक कप पाण्यात एक चमचा सफरचंदाचे व्हिनेगर घाला.  नियमित ब्रश करून गुळण्या करा. आठवड्यातून ३ वेळा हा उपाय केल्यास दातांचा पिवळेपणा दूर  होईल. 

४) केळी

केळीमध्ये पोटॅशियम, मँगनीज आणि मिनरल्स असतात. केळ्याच्या सालीच्या सफेद भागाने दात घासून घ्या. १ ते २ मिनिटं रगडून घ्या. काही वेळानं पुन्हा पाण्याने धुवा. हा उपाय केल्यानं चांगला परिणाम दिसून येईल. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल