Join us

उरलेले पदार्थ फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी लक्षात ठेवा ४ नियम! पोषण मिळेल आणि पोटही बिघडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2025 10:29 IST

Healthy food storage habits: Avoid food poisoning from leftovers: Best way to store cooked food in fridge: अन्न फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी ४ पर्याय लक्षात ठेवा. ज्यामुळे ते खराब होणार नाही आणि त्यातील पोषणतत्व देखील संपणार नाही.

आपल्यापैकी अनेकांच्या घरात फ्रीज आहे. स्वयंपाकघरातील एक महत्त्वाची गोष्ट आहे.(Healthy food storage habits) पदार्थ ताजे, फ्रेश आणि खराब होऊ नये म्हणून सहजपणे आपण फ्रीजचा वापर करतो.(Indian kitchen leftover food tips) पण अनेकदा पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा ते टिकून राहण्याऐवजी खराब होतात. शिजवलेले अन्न खराब होऊ नये म्हणून आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो.(Nutrition retention in refrigerated food) यामध्ये पदार्थ ताजे राहण्यास मदत होते. पण अन्नपदार्थ ठेवताना आपण काळजी घ्यायला हवी. (Food hygiene fridge storage tips) अनेकदा आपण जेवण बनवण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी आधीच करतो. ज्यामुळे पीठ किंवा इतर साहित्य आधीच तयार करुन फ्रीजमध्ये ठेवतो.(Fridge food storage safety tips) उरलेले अन्न किंवा शिजवलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यात बॅक्टेरिया वाढतात आणि खराब होण्याची शक्यता वाढते असं म्हटलं जातं. पण खरेतर हे चूक आहे. आपण हे अन्नपदार्थ कसे साठवून ठेवतो यावर सगळं काही अवलंबून असते. 

पितळी समया-निरांजनवर काळेकुट्ट मेणचट थर? ४ सोप्या टिप्स-न घासताच दिवे उजळतील लख्ख

पोषणतज्ज्ञ लिमा महाजन यांनी इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला. त्या म्हणतात अन्न फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी ४ पर्याय लक्षात ठेवा. ज्यामुळे ते खराब होणार नाही आणि त्यातील पोषणतत्व देखील संपणार नाही. 

1. जेव्हा आपण अन्नपदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये ०-४°C ठेवतो तेव्हा बॅक्टेरियाची वाढ मंदावते. ते बॅक्टेरिया मारत नाही. ज्यामुळे अन्न काहीवेळासाठी चांगले राहते. इतकेच नाही तर फ्रीजमध्ये अन्नपदार्थ ठेवल्याने त्यातील पोषकतत्व मरत नाही. पोषणतज्ज्ञ म्हणतात अनेकदा स्वयंपाक करताना पदार्थातील पोषणतत्व संपतात. त्यासाठी अन्नपदार्थ शिजवल्यानंतर ते योग्यरित्या थंड केल्यानंतर साठवायला हवे. ज्यामुळे ते दुसऱ्या दिवशी चविष्ट आणि पौष्टिक राहू शकते. 

2. अनेकदा घरातील मंडळी जेवल्यानंतर आपण पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतो. पण शिजवलेले पदार्थ २ तासांच्या आत फ्रीजमध्ये ठेवायला हवे. यामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा देखील समावेश आहे. यात बॅक्टेरियाचा धोका अधिक प्रमाणात वाढतो. याशिवाय अन्न गरम केले असेल तर सरळ फ्रीजमध्ये ठेवू नका. ते थंड होऊ द्या, नंतर फ्रीजमध्ये ठेवा. तापमानात बदल झाल्यानंतर अन्न खराब होण्याची शक्यता वाढते. यामुळे पदार्थ वाया जाणार नाहीत. 

3. पदार्थ आपल्याला फ्रीजमध्ये साठवायचे असतील तर त्यासाठी स्वच्छ आणि हवाबंद डब्यांचा वापर करा. अन्न उघड्या प्लेटमध्ये किंवा अॅल्युमिनियम फॉइलमध्ये ठेवल्यास लवकर खराब होते. इतकेच नाही तर त्याचा वास संपूर्ण फ्रीजमध्ये पसरतो. 

4. वारंवार अन्नपदार्थ गरम करत असाल तर ते टाळा. अन्न वारंवार गरम केल्याने पोषण कमी होते. आणि ते खराब होण्याचा धोका वाढतो. म्हणून एकदाच गरम करा.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स