Join us
Daily Top 2 Weekly Top 5

घोरणं बंद करणारे ४ सोपे उपाय-झोपही लागेल गाढ! घोरण्यामुळे तुम्हाला नावं ठेवणारेही होतील बदल पाहून चकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2025 15:56 IST

causes of snoring: snoring remedies: snoring remedies : आपण काही सवयी वेळीच सुधारल्या तर घोरण्याची समस्या नक्कीच कमी होऊ शकते.

अनेकांना रात्री घोरण्याची सवय असते. या आवाजामुळे घरातील इतर मंडळींची झोप पूर्ण होत नाही किंवा अनेकदा ते दचकून उठतात.(causes of snoring) घोरणे ही सामान्य समस्या जरी असली तरी या आवाजामुळे अनेकांची झोप मोड होते. पण याचा सगळ्यात जास्त त्रास घोरण्याला व्यक्तीला होत असतो.(snoring remedies) घोरणं ही फक्त सवय नसून अनेकदा ते आपल्या आरोग्याशी संबंधित समस्या असू शकते. सतत घोरणं श्वास घेताना अडथळा येणं, रात्री अचानक श्वास थांबल्यासारखं वाटणं ही लक्षणं दुर्लक्ष करण्यासारखी नाहीत. (snoring remedies)

९० च्या दशकातील 'या' अभिनेत्रीला मिळाली होती बोल्ड फोटोशूटची शिक्षा, आईनेही मारले होते कानशिलात आणि..

घोरण्यामागे अनेक कारणं असू शकतात. झोपेची चुकीची पोझिशन, जास्त वजन, मानेला किंवा घशात आलेली सूज, सर्दी-खोकला, अल्कोहोलचे सेवन या सगळ्यांचा परिणाम आपल्या झोपेवर होतो. काहींना रात्री पोटावर झोपण्याची सवय असते तर काहींना पाठीवर. त्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही. पण चुकीच्या झोपण्याच्या सवयींमुळे आपण घोरु लागतो. जर आपण काही सवयी वेळीच सुधारल्या तर घोरण्याची समस्या नक्कीच कमी होऊ शकते.

1. हेल्थलाइनच्या वृत्तानुसार पाठीवर झोपल्याने जीभ मागे सरकू लागते. ज्यामुळे श्वसनमार्गावर परिणाम होतो तर एका कुशीवर झोपल्याने श्वसनमार्ग व्यवस्थित सुरु राहतो, ज्यामुळे घोरणे थांबते. जर आपल्यालाही घोरण्याची सवय असेल तर एका कुशीवर झोपा. झोपेच्या कमतरतेमुळे घशाचे स्नायू अधिक सैल होतात. ज्यामुळे घोरण्याची सवय वाढते. त्यासाठी आपण दररोज ७ ते ८ तास झोप घ्यायला हवी. 

2. झोपताना उशीचा वापर करा. डोके वर ठेवल्याने आपले वायूमार्ग उघडे राहण्यास मदत होते. बाजारात नाकाची पट्टी किंवा नाकाचा डायलेटर वापरु शकतो. ज्यामुळे नाकपुड्या रुंद करतात. ज्यामुळे श्वास घेणे सोपे होते. झोपण्यापूर्वी दारु पिऊ नका. अल्कोहोल घशाच्या स्नायूंना त्रास देते. त्यासाठी झोपण्यापूर्वी किमान तीन ते चार तासांआधी दारु पिऊ नका. 

3. जर आपण झोपेच्या गोळ्या घेत असू तर यामुळे आपले घोरणे अधिक वाढू शकते. अशी औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. धूम्रपान केल्यामुळे घसा आणि नाकात सूज येते, ज्यामुळे आपले घोरणे वाढते. घशाभोवती जास्त चरबी वाढली असेल तर श्वसनमार्ग रुंद होतो. त्यामुळे जास्त वजन असणाऱ्या लोकांमध्ये घोरण्याची समस्या अधिक सतावते. 

4. पाण्याच्या कमतरतेमुळे घोरण्याची समस्या वाढते. कारण यामुळे नाक आणि घशातील श्लेष्मा जाड होतो. ज्यामुळे श्वसनमार्गात अडथळा निर्माण होतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्यायला हवे.   

English
हिंदी सारांश
Web Title : Stop Snoring: 4 Simple Remedies for Sound Sleep

Web Summary : Snoring disrupts sleep and can indicate health issues. Side sleeping, hydration, avoiding alcohol, and maintaining a healthy weight can help reduce snoring.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स