Join us

डोकं प्रचंड ठणकतं म्हणून पेलकिलर खाता, करा १ आयुर्वेदिक उपाय डोकेदुखी होईल चटकन गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2023 15:41 IST

How To Stop Headache without Painkiller Easy Home Remedy : ओव्हर द काऊंटर सतत गोळ्या घेणे आरोग्याच्यादृष्टीने घातक असते.

डोकेदुखी ही एक त्रासदायक समस्या आहे. सतत काही ना काही कारणाने डोके दुखणारे आपल्या आजुबाजूलाच असतात. डोकेदुखीची अनेक कारणे असली तरी आपले डोके नेमके कोणत्या कारणाने दुखते आहे हे समजून घेणे आणि त्यानुसार उपचार करणे हे एक जिकरीचे काम असते. कधी उन्हाचा तडाखा बसल्याने तर कधी अॅसिडीटीमुळे किंवा कधी आणखी काही कारणाने डोकेदुखी होऊ शकते.काही वेळा झोप घेतल्यावर किंवा आराम केल्यावर ही डोकेदुखी थांबते. मात्र काही वेळा ही डोकेदुखी थांबणारी नसल्याने यावर औषधोपचार करण्याशिवाय पर्याय नसतो. ताणतणाव, डोळ्यांना आलेला ताण ही डोकेदुखीची आणखी काही कारणे (How To Stop Headache without Painkiller Easy Home Remedy).

(Image : Google)

मायग्रेन ही तर डोकेदुखीची एक महत्त्वाची समस्या आहे. डोकेदुखी एकदा सुरू झाली की काय करावे सुधरत नाही. अशावेळी काम सुचत नाही की काहीच सुचत नाही. बरेचदा ऑफीसला जाण्याशिवाय पर्याय नसेल किंवा आणखी काही महत्त्वाची कामं असतील तर मेडिकलमध्ये जाऊन औषधे घेऊन तात्पुरती ही डोकेदुखी थांबवली जाते. पण काही वेळाने ती पुन्हा डोके वर काढते. मुख्य म्हणजे अशाप्रकारे ओव्हर द काऊंटर सतत गोळ्या घेणे आरोग्याच्यादृष्टीने घातक असते. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य मिहीर खत्री यासाठी १ सोपा उपाय सांगतात तो कोणता पाहूया...

उपाय काय? 

थोडासा गूळ घेऊन त्यात थोडेसे पाणी घाला आणि चमच्याने हलवून हे दोन्ही चांगले एकजीव करा. या पाण्यात ३ चिमूट सुंठ पावडर घाला. आता हे मिश्रण थोडे कोमट करायचे आणि बोटाने, ड्रॉपरने किंवा कापसाने या मिश्रणाचे २ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये घालायचे. असे केल्यानंतर गळ्यात कफ येईल तो थुंकून टाकायचा. त्यानंतर कोमट पाण्याने गुळण्या करायच्या अवघ्या ३० सेकंदात तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळेल. या उपायाने जादूप्रमाणे डोके दुखणे थांबेल असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. या उपायाने कोणत्याही पेनकिलरशिवाय तुमची डोकेदुखी थांबण्यास मदत होईल. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलहोम रेमेडी