Join us   

दिवसभराचा ताण काही मिनिटात निघून जाईल; एक्सपर्ट्नी सांगितल्या ६ ट्रिक्स, नेहमी आनंदी राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 8:51 AM

How To Relieve Stress Quickly : तणाव दूर करण्यासाठी, दररोज सकाळी कामावर, शाळेत किंवा कुठेही जाण्यापूर्वी 5 मिनिटे ध्यान करा. 

काही लोक छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेतात, जे आरोग्यासाठी खूप हानिकारक असते. तुमच्याबाबतीतही असे होत असेल तर हे उपाय तुमच्यासाठी उपयुक्त आहे. तणावापासून ताबडतोब आराम मिळवण्यासाठी काही केले नाही तर हा ताण हृदयविकाराचा झटका, पक्षाघात किंवा नैराश्यासारख्या गंभीर धोक्याला आमंत्रण देऊ शकतो. (Tips to relieve stress how to relieve stress) सुप्रसिद्ध जीवनशैली तज्ज्ञ डॉ. एच.के. खरबंदा यांच्या मते, तणावामुळे शरीराच्या सौंदर्यालाही हानी पोहोचते.

हेच कारण आहे की आरोग्य, सौंदर्य आणि आनंदासाठी तणाव दूर करणे खूप महत्वाचे आहे. तणाव दूर करण्यासाठी, दररोज सकाळी कामावर, शाळेत किंवा कुठेही जाण्यापूर्वी 5 मिनिटे ध्यान करा.  यामुळे दिवसभर मन तणावमुक्त राहते. याशिवाय आणखी काही उपाय आहेत. ज्यामुळे तणावापासून आराम मिळेल. (How To Relieve Stress Quickly)

ताण दूर करण्याचे ६ उपाय (What are the best stress relievers)

१) तणाव दूर करण्यासाठी आणि ताजेतवाने होण्यासाठी 10 मिनिटांच्या चालण्यापेक्षा चांगले काहीच नाही. उद्यानात किंवा बागेतल्या हिरव्यागार गवतावर चालल्याने तुमचा ताण कमी होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.

२) अंघोळीच्यावेळी एक कपामध्ये दूध पावडर, थोडं मीठ, गुलाबाच्या पाकळ्या, गुलाबाचे तेल, दोन चमचे बदामाचे तेल एकत्र करा. आंघोळ करताना टब किंवा बादलीत ठेवा. ताणतणाव दूर करण्यातही हे गुणकारी आहे.

३) तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी व्यायामही आवश्यक आहे. यासाठी तुम्ही सरळ उभे रहा. आता खाली वाका. हनुवटी जमिनीला समांतर असावी, म्हणजेच चेहरा समोर ठेवावा. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. काही काळ या स्थितीत राहिल्यानंतर, सामान्य स्थितीत या. तुम्हाला हलके वाटेल.

सतत मनात विचार येत असतात, चिडचिड होते? 4 उपाय, दिवसभर डोकं, मन राहील शांत

४) तणावाच्या स्थितीत फुगा फुगवणे विचित्र वाटू शकते, परंतु तणाव कमी करण्यासाठी ही एक प्रभावी कसरत आहे; यामुळे फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन पोहोचतो आणि रक्त परिसंचरण सुधारते.

५) स्टीम घेणं हा तणाव दूर करण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. स्टिम साध्या पाण्यासोबत घेतल्याने किंवा कोणतेही सुगंधी तेल टाकून घेतल्यास तुम्हाला ताजेतवाने वाटेल.

६) तणावमुक्त राहण्यासाठी तुमची नेहमी सकारात्मक मानसिकता असायला हवी. त्याच वेळी, प्रत्येक बाबतीत नकारात्मक भावना न ठेवता सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. तरच तुम्ही टेन्शनपासून दूर राहू शकाल, नाहीतर टेन्शन ही अशी गोष्ट आहे जी मरेपर्यंत तुमची साथ सोडत नाही.

टॅग्स : आरोग्यमानसिक आरोग्य