लॅपटॉप, मोबाईलसारखी स्क्रीन असणारी गॅजेट्स आजकाल आपल्या जीवनाचा अविभाज्य भागच होत आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सतत कोणती ना कोणती स्क्रीन पाहात असतो. एकीकडे या तंत्रज्ञानामुळे आपल्याला अनेक फायदे मिळत असले, तरी दुसरीकडे त्याचे काही तोटेही सहन करावे लागतात. यामध्ये स्क्रीन टाइम वाढल्यामुळे (How to relieve eye strain) डोळ्यांचे होणारे नुकसान ही सर्वात कॉमन समस्या आहे(How to reduce eye fatigue).
दिवस-रात्र फोन आणि लॅपटॉपच्या स्क्रीनकडे सतत पाहत राहिल्यामुळे आपल्या डोळ्यांवर खूप ताण पडतो, ज्यामुळे डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. यासाठीच या त्रासांपासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. सुप्रसिद्ध सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर 'आय स्ट्रेन' (डोळ्यांचा ताण) पासून सुटका मिळवण्यासाठी एक 'पोटली' बनवण्याची पद्धत शेअर केली आहे. यामुळे केवळ (Digital eye strain treatment) डोळ्यांचा थकवाच दूर होणार नाही, तर इतरही अनेक फायदे मिळतील. ही पोटली कशी बनवायची आणि त्याचे फायदे काय आहेत...
डोळ्यांचा थकवा, ताण मिनिटभरात कमी करणारी जादुई पोटली...
डोळ्यांचा थकवा, ताण मिनिटभरात कमी करणारी जादुई पोटली तयार करण्यासाठी, १ टेबलस्पून वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, १ टेबलस्पून बडीशेप, १ टेबलस्पून त्रिफळा चूर्ण, १ टेबलस्पून ज्येष्ठमध पावडर, आणि एक स्वच्छ मऊ सुती कापड इतक्याच साहित्याची गरज लागणार आहे.
डोळ्यांसाठी ही खास पोटली कशी तयार करावी ?
सर्वप्रथम एका लहान वाटीमध्ये सर्व घटक पदार्थ आणि सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या एकत्र करून नीट मिसळून घ्या. तयार केलेले हे मिश्रण एका मऊ सुती कापडावर ठेवा आणि त्याचे टोक एकत्र करून एका लहान पोटलीसारखे किंवा बॅगसारखे घट्ट बांधून घ्या. ही पोटली हलकी गरम करण्यासाठी साधारण १ ते २ मिनिटे गरम पाण्याच्या वाफेवर धरून ठेवा.
आय स्ट्रेन पोटलीचा वापर कसा करावा ?
ही तयार आय स्ट्रेन पोटली नॉर्मल टेम्परेचरवर किंवा हलकी गरम केल्यानंतर बंद डोळ्यांवर ठेवा. हलक्या हातांनी ही पोटली डोळ्यांवर साधारण १० ते १५ मिनिटे ठेवा. पोटली डोळ्यांवर ठेवलेली असताना शांतपणे बसून राहा किंवा झोपा. याचा दररोज वापर केल्याने डोळ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि थकवा दूर होईल.
बिनसाखरेचा चहा बिंधास्त प्यायल्यानेही होते आहे आरोग्याचे नुकसान, डॉक्टर सांगतात, हे एक चुकतं कारण...
डोळ्यांना आय स्ट्रेन पोटलीचा मसाज घेण्याचे फायदे...
१. ही पोटली डोळ्यांचा थकवा कमी करण्यास मदत करेल, विशेषतः जेव्हा तुम्ही दीर्घकाळ संगणक किंवा मोबाईल स्क्रीनकडे पाहत असता.
२. या पोटलीच्या वापरामुळे डार्क सर्कल्स कमी होऊ लागतात आणि डोळ्यांखालील थकवा दूर होतो.
३. ही पोटली डोळ्यांची जळजळ आणि कोरडेपणा शांत करते, ज्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि ताजेतवाने वाटते.
४. याचा वापर केल्याने पित्तामुळे निर्माण झालेली उष्णता कमी होऊन डोळ्यांना थंडावा आणि दिलासा मिळतो.
५. जर याचा सतत किंवा दररोज वापर केला, तर डोळे निरोगी आणि चांगले राहतात; तसेच डिजिटल उपकरणांच्या जास्त वेळ वापरामुळे होणाऱ्या नुकसानापासून डोळ्यांचे संरक्षण होते.
