युरिक ॲसिड वाढल्याचा त्रास सध्या कित्येक लोकांना होतो आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे हा त्रास होतो. शरीरात तयार झालेलं युरिक ॲसिड जेव्हा पुर्णपणे शरीराच्या बाहेर पडत नाही, शरीरात जमा होत राहातं, तेव्हा युरिक ॲसिडचा त्रास वाढत जातो. यामुळे मग हाडं, सांधे आखडल्यासारखे होतात. पायावर, शरीराच्या इतर भागांवर सूज आल्यासारखी होते. काही जणांना तर यामुळे किडनी स्टोनचा त्रासही होऊ शकतो. म्हणूनच युरिक ॲसिड वाढणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणूनच युरिक ॲसिड वाढू नये यासाठी कोणते पदार्थ खावे (best food for uric acid patients) आणि कोणते टाळावे ते पाहुया..(uric acid patients must avoid 5 foods)
युरिक ॲसिड वाढू नये म्हणून कोणते पदार्थ खाऊ नयेत?
ज्या लोकांच्या शरीरात युरिक ॲसिड जास्त प्रमाणात असतं त्या लोकांनी रेड मीट, ऑर्गन मीट, सी फूड खाणं टाळायला हवं. शाकाहारी जेवणावर भर द्यायला हवा.
पातळ, पांढरे केस नको तर आतापासूनच ५ पदार्थ खाणं सुरू करा, केसांच्या तक्रारी कायमच्या विसरा
त्याशिवाय बाजारात विकत मिळणारे पॅकबंद ज्यूस, सोडा असणारे पेयं, ट्रान्सफॅट असणारे पदार्थ, कोल्ड्रिंक घेणंही टाळावं. कारण या पदार्थांमुळे शरीरातलं युरिक ॲसिड वेगाने वाढतं. दारू पिण्याची सवयही सोडायला हवी. कारण युरिक ॲसिड वाढण्यासाठी ते ही एक मुख्य कारण आहे.
युरिक ॲसिडचा त्रास कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावे?
नोएडा येथील आहारतज्ज्ञ कामिनी शर्मा यांनी न्यूज १८ ला दिलेल्या माहितीनुसार युरिक ॲसिडचा त्रास कमी करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या. याशिवाय ओट्स, दलिया, ब्राऊन राईस, हिरव्या पालेभाज्या खाव्या.
व्हिटॅमिन B12 नेहमीच कमी असतं? चहा कॉफी पिण्याची 'ही ' सवय बदला, B12 वाढेल भराभर
मात्र पालक आणि मशरूम खाणे टाळावे. तसेच व्हिटॅमिन सी असणारी फळंही चांगल्या प्रमाणात खावी. ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असणाऱ्या पदार्थांमुळे तसेच लाे फॅट डेअरी पदार्थांमुळेही युरिक ॲसिड शरीराबाहेर पडण्यास मदत होते.
