Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > महिलांनाही छळतो डिमेंशिया-अर्थरायटिस, तज्ज्ञ सांगतात १ उपाय-सतत गोष्टी विसरणं धोक्याचं

महिलांनाही छळतो डिमेंशिया-अर्थरायटिस, तज्ज्ञ सांगतात १ उपाय-सतत गोष्टी विसरणं धोक्याचं

Health Tips: डिमेंशिया, अर्थरायटीस हे आजार होऊ नयेत आणि म्हातारपण निरोगी, आनंदी जावं म्हणून या काही खास टिप्स...(how to reduce the risk of dementia and arthritis?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2025 10:37 IST2025-06-26T15:07:14+5:302025-06-28T10:37:57+5:30

Health Tips: डिमेंशिया, अर्थरायटीस हे आजार होऊ नयेत आणि म्हातारपण निरोगी, आनंदी जावं म्हणून या काही खास टिप्स...(how to reduce the risk of dementia and arthritis?)

how to reduce the risk of dementia and arthritis, how to get relief from dementia and arthritis? | महिलांनाही छळतो डिमेंशिया-अर्थरायटिस, तज्ज्ञ सांगतात १ उपाय-सतत गोष्टी विसरणं धोक्याचं

महिलांनाही छळतो डिमेंशिया-अर्थरायटिस, तज्ज्ञ सांगतात १ उपाय-सतत गोष्टी विसरणं धोक्याचं

Highlightsहे आजार टाळायचे असतील तर शरीरातला वात दोष नियंत्रित असायला हवा. आणि त्यासाठीच .....

अगदी अलिकडच्या काळापर्यंत असं होतं की काही आजार हे फक्त वयस्कर व्यक्तींनाच व्हायचे आणि ते आजार झाले म्हणजे वय झालं असं आपोआप वाटायला लागायचं. पण आता मात्र खूप कमी वयातच वेगवेगळे आजार गाठू लागले आहेत. त्यामुळेच वयाचा आणि आजारांचा आता काही संबंध नाही, असंच वाटतं. मधुमेह, बीपी, कोलेस्टेरॉल, सांधेदुखी, गुडघेदुखी, हृदयविकार असे कित्येक आजार आता कमी वयातल्या लोकांना होत आहेत. डिमेंशिया आणि अर्थरायटीस या आजारांचं प्रमाणही वाढलं असून ते ही कमी वयातल्या कित्येक लोकांना झाल्याचं दिसून येतं (how to reduce the risk of dementia and arthritis?). असं आपल्या बाबतीत व्हायला नको आणि आपलं म्हातारपण निरोगी, आनंददायी जावं असं वाटत असेल तर आयुर्वेद तज्ज्ञांनी दिलेला हा उपाय एकदा बघाच...(how to get relief from dementia and arthritis?)

 

तूप आणि तेलाशी मैत्री करा...

डिमेंशिया तसेच अर्थरायटीस, सांधेदुखी हे आजार नको असतील तर चाळिशीनंतर तेलाशी आणि तुपाशी मैत्री करा, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. हे वाचून थोडं विचित्र नक्कीच वाटेल. कारण हे दोन्ही पदार्थ शरीरासाठी किती घातक आहेत हे आपण पाहातो आहोत.

मुलांच्या शाळेच्या पांढऱ्या बुटांवर चिखलाचे डाग पडले? ३ उपाय- न धुता बूट होतील स्वच्छ

म्हणूनच डाॅक्टरांना काय म्हणायचे आहे ते थोडं विस्ताराने पाहूया.. त्यांनी याविषयीची माहिती bijayanand या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये डॉक्टर असं सांगत आहेत की चाळिशीनंतर शरीरातला वात दोष नैसर्गिकपणे वाढत जातो. याचा परिणाम म्हणून मग चाळिशीनंतर आपलं शरीर आतून कोरडं पडत जातं आणि डिमेंशिया, अर्थरायटीस, सांधेदुखी, संधीवात असे त्रास वाढत जातात.

 

हे आजार टाळायचे असतील तर शरीरातला वात दोष नियंत्रित असायला हवा. आणि त्यासाठीच आपल्या आहारात साजूक तुपाचे प्रमाण योग्य असायला हवे. साजूक तूपामध्ये अनेक पौष्टिक घटक असून रोज ते थोडे का होईना पण अवश्य खायला हवे.

केसांसाठी, त्वचेसाठी कोरफड चांगलीच; पण नेमकी वापरायची कशी? बघा ७ वेगवेगळ्या पद्धती

तज्ज्ञांनी सांगितलेला दुसरा उपाय म्हणजे तेलाने अंगाला मालिश करणे. यासाठी थंडीच्या दिवसांत तिळाचे तेल तर उन्हाळ्याच्या दिवसांत खोबरेल तेल वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. तेल थोडे गरम करावे आणि त्याने शरीराला, विशेषत: सांध्यांना व्यवस्थित मालिश करावी. 


 

Web Title: how to reduce the risk of dementia and arthritis, how to get relief from dementia and arthritis?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.