Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री-अपरात्री लागणारी भूक आता वाढवणार नाही वजन! मध्यरात्री खायचेच तर बिंधास्त खा ‘हे’ पदार्थ...

रात्री-अपरात्री लागणारी भूक आता वाढवणार नाही वजन! मध्यरात्री खायचेच तर बिंधास्त खा ‘हे’ पदार्थ...

healthy snacks to control sugar cravings : what to eat when craving sweets : best low calorie snacks for cravings : how to reduce sugar cravings naturally at home : फूड क्रेव्हिंगला शांत करतील आणि आपल्याला फिट ठेवण्यास मदत करतील असे १० हेल्दी पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2026 18:00 IST2026-02-16T18:00:00+5:302026-02-16T18:00:02+5:30

healthy snacks to control sugar cravings : what to eat when craving sweets : best low calorie snacks for cravings : how to reduce sugar cravings naturally at home : फूड क्रेव्हिंगला शांत करतील आणि आपल्याला फिट ठेवण्यास मदत करतील असे १० हेल्दी पदार्थ...

how to reduce sugar cravings naturally at home healthy snacks to control sugar cravings best low calorie snacks for cravings | रात्री-अपरात्री लागणारी भूक आता वाढवणार नाही वजन! मध्यरात्री खायचेच तर बिंधास्त खा ‘हे’ पदार्थ...

रात्री-अपरात्री लागणारी भूक आता वाढवणार नाही वजन! मध्यरात्री खायचेच तर बिंधास्त खा ‘हे’ पदार्थ...

आपल्यापैकी अनेकांना पोट भरलेलं असतानाही अचानक गोड खाण्याची खूप इच्छा होते किंवा रात्री उशिरा काहीतरी खाण्याची क्रेविंग्स सुरू होतात. कामाचा ताण, अपुरी झोप, हार्मोन्समधील बदल किंवा चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे अशा क्रेविंग्स वारंवार जाणवतात. मात्र अशावेळी बिस्किटं, चॉकलेट, तळलेले किंवा जंक फूड खाल्ल्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते आणि त्याचा परिणाम पचन, साखरेची पातळी आणि एकूणच आरोग्यावरही दिसून येतो. आपल्यापैकी अनेकांना या 'फूड क्रेविंग्स'चा अनुभव रोजच येतो. वारंवार रात्री - अपरात्री होणाऱ्या या फूड क्रेविंग्समुळे आपलं मन पुन्हा पुन्हा अनहेल्दी पदार्थ भरपूर प्रमाणात खाण्याकडे सारखं धावतं...(how to reduce sugar cravings naturally at home).

अवेळी खाल्लेले हे पदार्थ केवळ वजनाचा आकडाच वाढवत नाहीत, तर आरोग्याच्या अनेक तक्रारींनाही आमंत्रण देतात. पण, या क्रेविंग्सवर ताबा मिळवणं म्हणजे 'उपाशी राहणं' नक्कीच नाही! उलट, अशावेळी आपल्या शरीराला योग्य पोषणाची गरज असते. अशा परिस्थितीत, जर आपण साखरेऐवजी नैसर्गिक गोडवा (healthy snacks to control sugar cravings) आणि जंक फूडऐवजी पौष्टिक पदार्थांची निवड केली, तर आपण आपली भूकही भागवू शकतो आणि आरोग्याची काळजीही घेऊ शकतो. आपण असेच काही 'स्मार्ट स्नॅकिंग'चे हेल्दी पर्याय पाहूयात, जे आपल्या फूड क्रेविंग्सला शांत करतील आणि आपल्याला फिट ठेवण्यास मदत करतील. क्रेविंग्सच्या वेळी खाण्यासाठी (best low calorie snacks for cravings) कोणते हेल्दी पदार्थ फायदेशीर ठरतात आणि ते खाल्ल्याने शरीराला नेमके कोणते फायदे मिळतात.

अवेळी अचानक क्रेविंग्स होऊ लागल्यास खावेत असे हेल्दी पदार्थ... 

१. गोड खाण्याच्या क्रेव्हिंगसाठी स्मार्ट पर्याय :-

१. डार्क चॉकलेट (किमान ७०%) :- डार्क चॉकलेट हे साखर नियंत्रित करण्यास मदत करते आणि यामध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स असतात. योग्य प्रमाणांत डार्क चॉकलेट खाल्ल्यास ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. 

२. फ्रूट सॅलॅड किंवा ताजी फळे :- सफरचंद, केळी, पपई किंवा द्राक्षे यांसारखी फळे नैसर्गिक गोडव्यासोबतच आरोग्यासाठी फायफदेशीर असे फायबर आणि महत्वाची जीवनसत्त्वे पुरवून शरीराचे पोषण करतात. 

३. खजूर किंवा मनुके :- खजूर किंवा मनुके हे ड्रायफ्रूट्स गोड खाण्याची क्रेव्हिंग लगेच शांत करतात आणि सोबतच इन्स्टंट एनर्जी देखील देतात. 

किती दिवस उशीरा आली मासिक पाळी तर 'नॉर्मल' समजायचे? पाळी नियमित येण्यासाठी करा ३ गोष्टी...

४. ग्रीक योगर्टमध्ये मध आणि फळे मिसळून खा :- हा एक चविष्ट, क्रीमी आणि प्रथिनयुक्त नाश्ता आहे, जो पोटभरीचा तर असतोच आणि गोड खाण्याची इच्छा देखील कमी करतो.

५. शुगर-फ्री ओट्स लाडू किंवा घरी बनवलेले एनर्जी बॉल्स :- हा एक उत्तम गोड आणि हेल्दी पर्याय आहे. ओट्स हलके भाजून घ्या आणि त्यात खजूरची पेस्ट, सुका मेवा (बदाम, अक्रोड) व थोडे तूप किंवा मध एकत्र करा. या मिश्रणात चवीसाठी वेलची पूड किंवा डार्क चॉकलेटचे तुकडे घालून त्याचे लहान लाडू वळून घ्या. हे लाडू तुम्ही नैसर्गिकरित्या गोड आणि पौष्टिक पर्याय म्हणून कधीही खाऊ शकता, ज्यामुळे वजनही वाढत नाही.

२. खारट/तिखट (नमकीन) खाण्याच्या क्रेव्हिंगसाठी स्मार्ट पर्याय :-

१. भाजलेले चणे किंवा मखाणे :- भाजलेले चणे किंवा मखाणे हे लो-कॅलरी स्नॅक आहे, जे थोडे मीठ आणि मसाल्यांसोबत चविष्ट लागते. 

२. लिंबू पाणी किंवा ताकात सैंधव मीठ मिसळून प्या :- लिंबू पाणी आणि ताक हे केवळ नमकीन खाण्याची क्रेविंग्स शांत करत नाही, तर पचन आणि हायड्रेशनमध्येही मदत करते.

३. बेसन किंवा मूग डाळ धिरडे (चीला) :- प्रथिनयुक्त असलेला हा एक चांगला पर्याय आहे, जो आपण हलके मसाले आणि भाज्या वापरून बनवू शकता.

दूध नासलं? नो टेंन्शन! पनीर करण्यासोबतच आहेत ६ भन्नाट फायदे - शेजारीही विचारतील तुमचे स्पेशल सिक्रेट...   

२ कप रव्याच्या होतील १०० पाणीपुरीच्या पुऱ्या!  पुरी फुगेल फुग्यासारखी टम्म, कुरकुरीत...

४. काकडी, गाजरचे तुकडे आणि हँग कर्ड डिप :- कुरकुरीत भाज्या आणि क्रीमी दह्याचे डिप नमकीन चवीसोबत आरोग्याचीही काळजी घेते.

५. एअर-पॉप्ड पॉपकॉर्न (लोणी - बटर नसलेले) :- हा एक कमी फॅट्स आणि हाय फायबर तसेच चटपटीत व कुरकुरीत पदार्थ आहे, जो नमकीन खाण्याची इच्छा पूर्ण करतो.

खाण्याची क्रेव्हिंग होणे नॉर्मल आहे, परंतु योग्य पर्यायांची निवड तुम्हाला फिट आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. पुढच्या वेळी जेव्हा गोड किंवा नमकीन खावेसे वाटेल, तेव्हा या स्मार्ट पर्यायांची निवड करा आणि चवीसोबत आरोग्यही जपा.

Web Title : आधी रात की भूख? वजन नियंत्रण के लिए स्वस्थ विकल्प!

Web Summary : आधी रात की भूख को स्वस्थ विकल्पों से नियंत्रित करें! जंक फूड के बजाय फल, डार्क चॉकलेट, भुने चने या घर के बने एनर्जी बॉल्स चुनें। ये विकल्प वजन नियंत्रण और स्वास्थ्य का समर्थन करते हैं।

Web Title : Healthy midnight cravings: Guilt-free snacks for weight management and well-being.

Web Summary : Control midnight cravings with healthy alternatives! Choose fruits, dark chocolate, roasted chickpeas or homemade energy balls over junk food. These options satisfy your cravings while supporting weight management and overall health.