Join us

तेलकट- तुपकट न खाताही कोलेस्टेरॉल वाढतं? तज्ज्ञ सांगतात ५ गोष्टी करा- कोलेस्टेरॉल कमी होईल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2025 17:02 IST

Health Tips To Reduce Cholesterol Level: शरीरातलं कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या हल्ली खूप जास्त वाढली आहे. त्यासाठीच पाहा हे काही उपाय..(how to reduce cholesterol?)

ठळक मुद्दे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी कोणकोणते उपाय करता येतील?

आपली जीवनशैली बदलली तसे तसे आजार आणि त्यांचे स्वरुपही बदलले. हल्ली कमी वयातच मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असे त्रास तर होतच आहेत. पण त्यासोबतच रक्तातील कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड वाढणे यांचे प्रमाणही खूप असल्याचे दिसून येते.. रक्तातले हे दोन्ही घटक वाढले की अनेक जण तब्येतीच्या बाबतीत खूप सतर्क होतात. तेलकट- तुपकट पदार्थांसह गोड पदार्थ खाणंही कमी करतात. पण तरीही अनेकांच्या कोलेस्टेरॉल पातळीत काही फरक दिसून येत नाही (how to get rid of high cholesterol?). त्यांचं कोलेस्टेरॉल नेहमीच वाढलेलं दिसतं (how to reduce cholesterol?). तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी नेमकं काय करावं ते पाहा..(health tips to reduce cholesterol level)

 

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काय करावं?

रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी कोणकोणते उपाय करता येतील, याविषयी मायोक्लिनिक लिंकवर तज्ज्ञांनी पुढे सांगितलेल्या काही गोष्टी सुचविल्या आहेत.

फरशी पुसण्याचा मॉप मळकट- घाण झाला? 'या' पद्धतीने धुवा- नव्यासारखा स्वच्छ पांढरा होईल 

१. आहारात फायबरयुक्त पदार्थ अधिकाधिक प्रमाणात असावे. जर आहारात पुरेशा प्रमाणात फायबर असतील तर LDL म्हणजेच बॅड कोलेस्टेरॉल शरीराबाहेर फेकण्यास मदत होते. यासाठी ओट्स, सफरचंद, गाजर, बीन्स, मसूर, रताळे, ॲव्हाकॅडो, बदाम असे पदार्थ दररोजच खायला हवे.

कोथिंबीरीच्या देठांची चटपटीत चटणी! ट्राय करा 'ही' रेसिपी- चटणीसाठी देठं नेहमी सांभाळून ठेवाल..

२. शारिरीकदृष्ट्या तुम्ही जेवढं ॲक्टीव्ह राहाल तेवढं तुमचं कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे नियमितपणे व्यायाम करणे हा एक उत्तम पर्याय आहे. याविषयी तज्ज्ञ असं सांगतात की आठवड्यातून कमीतकमी १५० मिनिटे तरी तुम्ही वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग, रनिंग, जॉगिंग असे व्यायाम करायला हवे.

 

३. मद्यपानाच्या सवयीमुळेही कोलेस्टेरॉल वाढते. शिवाय त्यामुळे रक्तदाबही वाढतो. त्यामुळे अशा सवयी सोडून द्या. 

४. फिश ऑईल सप्लिमेंट घ्याव्या. त्यातून ओमेगा ३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे ट्रायग्लिसराईड कमी होऊन हृदय निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते.

हार्ट ॲटॅकचा धोका कमी करणाऱ्या ५ गोष्टी! तज्ज्ञ सांगतात कमी वयात हृदयविकार नको तर..

५. आहारात नियमितपणे लसूण खाल्ल्यानेही बॅड कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सगळ्यात आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय महत्त्वाचे आहे, हे लक्षात घ्यावे.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहृदयविकाराचा झटकाहृदयरोगअन्नव्यायाम