हल्ली आहारपद्धती आणि कामाचं स्वरुप या दोन्ही गोष्टी खूप बदलल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होतो. म्हणूनच हल्ली कमी वयातच ट्रायग्लिसराईड आणि कोलेस्टेरॉल वाढण्याची कित्येक उदाहरणे आपण आसपास पाहातो. जेव्हा रक्तातील हे दोन्ही घटक जास्त प्रमाणात वाढतात तेव्हा ते रक्तप्रवाहामध्ये अडथळे निर्माण करतात. याचा थेट परिणाम हृदयावर होतो आणि मग हृदयविकाराचे प्रमाण वाढते. म्हणूनच रक्तातील हे दोन्ही घटक नियंत्रित ठेवायचे असतील तर पुढे सांगितलेला उपाय नक्कीच उपयुक्त ठरू शकतो.(home hacks to get rid of cholesterol and triglyceride)
कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड नियंत्रित ठेवण्यासाठी उपाय
कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड हे दोन्ही घटक वाढू द्यायचे नसतील तर त्यासाठी कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो याविषयीची माहिती आयुर्वेद अभ्यासक स्वामी ध्याननिरव यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यासाठी ते सांगतात की १ वाटी दही घ्या.
हिवाळ्यात खायलाच हवं चटपटीत लसूण लोणचं, महिनोंमहिने टिकेल- जेवणाची चव वाढेल, घ्या सोपी रेसिपी
त्यामध्ये २ चमचे इसबगोल घालून व्यवस्थित कालवा आणि मग हे दही खा. दही आणि इसबगोल यांच्यामध्ये असणारे काही पौष्टिक घटक एकत्रितपणे काम करून कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड कमी करतात. यासोबतच अपचन, पोट फुगणे, कॉन्स्टिपेशन, गॅसेस असे त्रास कमी करण्यासाठीही हे दोन्ही पदार्थ एकत्रित खाणे फायद्याचे ठरते. प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असल्याने हा उपाय सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरेल असे नाही. म्हणूनच आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि मग हा उपाय करावा.
कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड कमी करण्यासाठी इतर उपाय
१. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. गोड, तेलकट, तुपकट, प्रोसेस्ड फूड, जंक फूड, मैद्याचे पदार्थ कमी प्रमाणात खावे किंवा पुर्णपणे टाळावे.
फक्त २ रुपयांची कॉफी खुलवेल तुमचं सौंदर्य, महागडे कॉस्मेटिक्सही पडतील फिके, बघा कशी वापरायची कॉफी
२. दररोज नियमितपणे व्यायाम करावा. व्यायाम केल्यास हे दोन्ही घटक बऱ्यापैकी नियंत्रित राहण्यास मदत होते.
३. आहारात फायबर, सलाड, प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असावे. त्याचबरोबर ओमेगा ३, हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळं भरपूर प्रमाणात असावी.