सध्या झपाट्याने वाढताना दिसून येणाऱ्या काही आजारांपैकी एक आजार म्हणजे कॅन्सर.. काही दिवसांपुर्वीच मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचाही खूप कमी वयात कॅन्सरने मृत्यू झाल्याचे आपण ऐकले. अशी कित्येक उदाहरणे आपल्या आजुबाजुला आहेत. कॅन्सरचे वाढते रुग्ण पाहिले की धडकी भरते. या आजाराने आपल्याला गाठूच नये असे वाटते. निरोगी जीवनशैलीद्वारे आपण कॅन्सरचा धोका नक्कीच कमी करू शकतो (how to reduce cancer risk?). पण तरीही ज्या लोकांच्या घरात कॅन्सरची हिस्ट्री आहे, म्हणजेच ज्या लोकांच्या ब्लड रिलेशनमधल्या नातेवाईकांना कॅन्सर झालेला आहे, अशा लोकांनी थोडी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, असा इशारा WHO ने दिला आहे.(which factors increases the risk of cancer?)
कॅन्सरची हिस्ट्री असणाऱ्यांनी कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
आजकाल कोणाला कधी कॅन्सर होईल हे काही सांगता येत नाही. पण तरीही ज्या लोकांच्या घरात कॅन्सरची हिस्ट्री असते, त्या लोकांना इतर लोकांच्या तुलनेत कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. त्यातही ब्रेस्ट कॅन्सर, कोलन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर या कॅन्सरमध्ये अनुवंशिकतेचं प्रमाण जास्त दिसून येतं. त्यामुळे मेमोग्राफी, पॅप टेस्ट, कोलोनोस्कोपी अशा टेस्ट करून या अवयवांची वारंवार तपासणी करून घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच कोणतंही लहानसं दुखणंही अंगावर काढू नये. लगेचच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
खाण्यापिण्याच्या सवयींकडे अगदी कमी वयापासूनच लक्ष द्यायला हवे. प्रोसेस्ड फूड, केमिकल्स असणारे अन्न खाणं पुर्णपणे टाळायला हवं. घरी केलेल्या सकस आहारावर तुमचा भर असायला हवा. त्याशिवाय आहारात हंगामी फळंही भरपूर प्रमाणात हवी. कारण त्यातून बऱ्याच प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतात, जे कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी मदत करू शकतात. दारू, सिगारेट अशा व्यसनांपासून दूर राहावे. तसेच कोणता ना कोणता व्यायाम नियमितपणे करावा. या काही सवयी स्वत:ला लावून घेतल्या तर कॅन्सरचा धोका कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकते.
