कडक उन्हाळा सुरू झाला की, आपल्या शरीराचे तापमान अचानक वाढू लागते. उष्णतेच्या या लाटांमुळे अनेकदा अंगाची होणारी आग-आग आणि डोळ्यांची होणारी जळजळ आपल्याला त्रासदायक ठरते.(Summer Tips) डोळे लाल होणे, त्यातून पाणी येणे किंवा डोळ्यांसमोर अंधारी येणे, ही लक्षणे शरीरातील वाढलेल्या उष्णतेची धोक्याची घंटा असू शकतात. ही लक्षणे म्हणजे आपले शरीर आतून 'ओव्हरहीट' झाल्याचा संकेत आहे. अनेकदा आपण लिंबू सरबत किंवा थंड पेयांचा आधार घेतो, पण त्याने केवळ तात्पुरता आराम मिळतो.(Best tips to stay cool in summer) उष्णता मुळापासून घालवण्यासाठी शरीराला आतील बाजूने थंड करणे आवश्यक असते.(Relieving eye strain and heat in summer) अनेकदा आपण चुकीच्या ठिकाणी उपाय करतो. कपाळावर चंदनाचा लेप लावणे किंवा डोळ्यांवर काकडीचे काप ठेवणे हे तात्पुरते उपाय आहेत पण उष्णतेचे मूळ केंद्र वेगळेच असते.(Summer health tips in Marathi) आयुर्वेदामध्ये अशा काही खास पद्धती सांगितल्या आहेत, ज्यांचा वापर केल्यास शरीरातील वाढलेली उष्णता नैसर्गिकरित्या बाहेर पडते. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढल्यास कोणते मॅजिक उपाय करायला हवे पाहूया.
१५ दिवस जास्त पुरेल गॅस, पाहा स्वयंपाकाचा गॅस बचतीसाठी ५ स्मार्ट ट्रिक्स, स्वयंपाक झटपट-गॅसचीही बचत
तळपायांची आग होणं ही अतिउष्णतेचे मुख्य लक्षण आहे. आयुर्वेदात यावर काशाच्या वाटीचा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. तळपायाला शुद्ध तूप चोळा, नंतर काशाच्या वाटीने हे तळपायाला घासा. या तुपाने हळूवार मसाज करा. जर मसाज करताना तूप बाहेर येत असेल किंवा काळपट पडत असेल तर शरीरातील उष्णता बाहेर पडत आहे असं समजावे. हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी केल्यास गाढ झोप लागते आणि तळपायांची आग पूर्णपणे शांत होते.
आपली नाभी ही शरीरातील ७२००० नसांचे मुख्य केंद्र आहे. कपाळावर चंदनाचा लेप लावण्यापेक्षा बेंबीवर लावल्यास आपल्याला आराम मिळेल. त्यासाठी शुद्ध चंदन पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या बेंबीच्या भोवती गोलाकार पद्धतीने लावा. बेंबीतून हा थंडावा आपल्या पोटापर्यंत जाईल आणि त्यातून शरीराला मिळेल. ज्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते. हा उपाय उन्हाळ्यात दररोज सकाळी किंवा दुपारी केल्यास डोळ्यांची जळजळ कमी होण्यास मोठी मदत होते.
शरीरातील उष्णता मुळापासून काढून टाकण्यासाठी तांदूलोदक हे अमृतच आहे. हे पेय रक्तातील उष्णता कमी करण्यासाठी चांगलं मानलं जातं. यासाठी १ वाटी तांदूळ घ्या आणि ६ तास पाण्यात भिजत ठेवा. ६ तासांनंतर हे तांदूळ त्या पाण्यातच हाताने व्यवस्थित चोळून घ्या. त्यानंतर हे पाणी गाळून एका ग्लासात घ्या. हे पाणी दिवसातून एकदा प्या. या पाण्यामुळे रक्तातील उष्णता कमी होते आणि शरीर आतून थंड राहते.
Web Summary : Summer heat causes eye irritation. Ayurveda suggests massaging feet with ghee, applying sandalwood paste to the navel, and drinking rice water to naturally cool the body.
Web Summary : गर्मी के कारण आँखों में जलन होती है। आयुर्वेद घी से पैरों की मालिश करने, नाभि पर चंदन का लेप लगाने और शरीर को प्राकृतिक रूप से ठंडा करने के लिए चावल का पानी पीने का सुझाव देता है।