Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कबुतरांचा उच्छाद ठरला जीवघेणा, चित्रा वाघ यांनी सांगितला भयंकर अनुभव! मरणयातना भोगाव्या लागतात कारण..

कबुतरांचा उच्छाद ठरला जीवघेणा, चित्रा वाघ यांनी सांगितला भयंकर अनुभव! मरणयातना भोगाव्या लागतात कारण..

how to prevent diseases spread by pigeons, pigeon coop is dangerous than virus : कबुतरांच्या विष्ठेमुळे जाऊ शकतो जीव. पाहा किती धोकादायक आहे हा पक्षी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2025 16:23 IST2025-07-04T16:19:48+5:302025-07-04T16:23:28+5:30

how to prevent diseases spread by pigeons, pigeon coop is dangerous than virus : कबुतरांच्या विष्ठेमुळे जाऊ शकतो जीव. पाहा किती धोकादायक आहे हा पक्षी.

how to prevent diseases spread by pigeons, pigeon coop is dangerous than virus | कबुतरांचा उच्छाद ठरला जीवघेणा, चित्रा वाघ यांनी सांगितला भयंकर अनुभव! मरणयातना भोगाव्या लागतात कारण..

कबुतरांचा उच्छाद ठरला जीवघेणा, चित्रा वाघ यांनी सांगितला भयंकर अनुभव! मरणयातना भोगाव्या लागतात कारण..

घराजवळ कबुतर दिसू नये यासाठी आपण विविध उपाय करत असतो. शहरांमध्ये जास्त त्रास जाणवतो. (how to prevent diseases spread by pigeons, pigeon coop is dangerous than virus )कारण उंच इमारतींच्या बाल्कनीत कबुतर त्यांचे घर तयार करतात, पिल्ले घालतात. तिथेच राहतात. त्यामुळे बाल्कनी खिडक्या खराब होतात. मात्र फक्त खराब नाही होत तर कबुतर रोगराई पसरवतात. त्याची लागण झाल्यावर मृत्यूदेखील होऊ शकतो. 

चित्रा वाघ यांनी हल्लीच त्यांचा एक फार धक्कादायक अनुभव सांगितला. त्यांनी मुंबई महानगरपालिकेकडे कबुतर खाने बंद करण्यासाठी प्रस्तावही मांडला आहे. त्यांच्या मामीचा मृत्यू कबुतरांमुळे पसरणाऱ्या आजाराने झाल्याचे त्यांनी सांगितले.कबुतरांमुळे पसरणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी आधी कबुतरखाना बंद करायला हवा. कबुतरांना धान्य घालणे आणि घराजवळ आसरा देणे बंद करणे गरजेचे आहे.

कबुतरांमुळे खरंच आजार पसरतात का ? तर हो. कबुतरांमुळे फक्त रोगराई पसरत नाही तर आरोग्यासाठी एक गंभीर समस्या आहे. विशेषतः शहरी भागात जिथे कबुतरांची संख्या जास्त असते. त्यांच्या विष्ठेतील बुरशी तसेच जंतू आणि परजीवी माणसांमध्ये विविध आजार पसरवतात. 

हिस्टोप्लाझ्मोसिस हा श्वसनमार्गातील एक आजार आहे. जो या बुरशीमुळे होतो. कबुतरांच्या किंवा वटवाघळांच्या विष्ठेने दूषित झालेल्या मातीतील बुरशीचे कण मिसळतात. नंतर हवेत मिसळल्यावर ते श्वासावाटे शरीरात प्रवेश करतात. लक्षणांमध्ये ताप, खोकला, थकवा, डोकेदुखी आणि छातीत वेदना यांचा समावेश होतो. ही बुरशी शरीराला आतून खराब करते.  

तसेच सिटाकोसिस हा आजारही होतो. कबुतराच्या विष्ठेतून हा विषाणू पसरतो आणि न्यूमोनिया , स्नायूंचे दुखणे, थकवा, दमा असे त्रास होतात. मेंदूला दुखापत होण्याची शक्यताही जास्त असते. 

इतरही काही आजार आहेत जे कबुतरांमुळे होतात. लहान मुलांसाठी कबुतरांच्या आजूबाजूला फिरणेही त्रासाचे ठरु शकते. श्वासाचे त्रास झाल्यावर त्यातून बरे होणे जरा कठीणच जाते. आपल्या घराजवळ कबुतरांची विष्ठा पडली असेल तर ती लगेच साफ करा त्यातून रोग झपाट्याने पसरते. 


Web Title: how to prevent diseases spread by pigeons, pigeon coop is dangerous than virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.