Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > धुसर दिसण्याचा, मोतिबिंदूचा धोका कमी करतात 'या' गोष्टी, डोळे नेहमीसाठी राहतील चांगले

धुसर दिसण्याचा, मोतिबिंदूचा धोका कमी करतात 'या' गोष्टी, डोळे नेहमीसाठी राहतील चांगले

वाढत्या वयासोबत डोळ्यांच्या लेन्स हळूहळू धुसर होऊ लागतात. ज्यामुळे स्पष्ट दिसत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 11:05 IST2026-04-05T11:01:54+5:302026-04-05T11:05:01+5:30

वाढत्या वयासोबत डोळ्यांच्या लेन्स हळूहळू धुसर होऊ लागतात. ज्यामुळे स्पष्ट दिसत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात.

How to prevent cataracts naturally simple daily habits | धुसर दिसण्याचा, मोतिबिंदूचा धोका कमी करतात 'या' गोष्टी, डोळे नेहमीसाठी राहतील चांगले

धुसर दिसण्याचा, मोतिबिंदूचा धोका कमी करतात 'या' गोष्टी, डोळे नेहमीसाठी राहतील चांगले

How To Prevent Cataracts Naturally : वाढत्या वयानुसार डोळ्यांनी दिसणं कमी होणं फारच कॉमन आहे. पण जर योग्य ती काळजी घेतली तर वाढत्या वयातही आपण दृष्टी चांगली ठेवू शकता. बऱ्याच लोकांना डोळ्यांसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. कॅटरेक्ट ही अशीच एक समस्या. जी वाढत्या वयात बघायला मिळते. पण चांगली बाब ही आहे की, काही चांगल्या सवयी लावल्या तर या समस्येचा धोका कमी केला जाऊ शकतो. अशात जाणून घेऊया की, ही समस्या काय असते आणि त्यावर काय उपाय करता येईल.

वाढत्या वयासोबत डोळ्यांच्या लेन्स हळूहळू धुसर होऊ लागतात. ज्यामुळे स्पष्ट दिसत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे की, जास्त उन्हात राहणे, डायबिटीस कंट्रोल नसणे आणि धुम्रपानाची सवय. womansworld च्या रिपोर्टनुसार, योग्य लाइफस्टाईल फॉलो करून हा प्रभाव बराच कमी केला जाऊ शकतो.

उन्हापासून बचाव

डोळे चांगले ठेवायचे असेल तर सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे उन्हापासून बचाव करा. उन्हात जाताना सनग्लासेस आणि टोपी घालून उन्हापासून डोळ्यांचा बचाव केला जाऊ शकतो. खासकरून UV 400 असलेले चष्मे डोळ्यांना अधिक सुरक्षा देतात. त्यासोबतच आहाराची देखील यात महत्वाची भूमिका असते. व्हिटामिन सी असलेल्या गोष्टी जसे की, शिमला मिरची, संत्री, स्ट्रॉबेरी आणि ब्रोकली डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते. यातील अँटी-ऑक्सीडेंट्स डोळ्यांचं नुकसान करणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात.   

व्यायामाची गरज

दररोज हलका व्यायाम किंवा वॉक केल्याने डोळ्यांतील रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि वयानुसार होणाऱ्या समस्या कमी होतात.

मल्टीव्हिटॅमिन्सचा उपयोग

मल्टीव्हिटॅमिन्समध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यास मदत करतात. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांचा वापर करावा.

तणावावर नियंत्रण

जास्त तणावामुळे शरीरात कोर्टिसोल वाढतो, ज्याचा डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रिलॅक्स राहणे, छोट्या सवयी जसे च्युइंग गम चघळणे, मदत करू शकतात.

Web Title : मोतियाबिंदु से बचाव: आँखों को स्वस्थ रखने के सरल उपाय।

Web Summary : मोतियाबिंदु से बचने के लिए धूप से आँखों को बचाएं, मधुमेह को नियंत्रित करें और धूम्रपान से बचें। स्वस्थ दृष्टि के लिए विटामिन सी युक्त खाद्य पदार्थ खाएं, व्यायाम करें और तनाव का प्रबंधन करें। मल्टीविटामिन लेने से पहले डॉक्टर से सलाह लें।

Web Title : Prevent cataracts: Simple steps to keep your eyes healthy.

Web Summary : Protect eyes from sun, manage diabetes, and avoid smoking to prevent cataracts. Consume Vitamin C-rich foods, exercise, and manage stress for healthy vision. Consult doctor before taking multivitamins.